Sowing Machine Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : ‘बीबीएफ’द्वारे आठ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी प्रस्तावित

Soybean Cultivation : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्राद्वारे ८ हजार हेक्टरवर सोयाबीनचे पेरणीचे नियोजन विभागाकडून केले जात आहे.

Team Agrowon

Soybean Cultivation In Parbhani : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्राद्वारे ८ हजार हेक्टरवर सोयाबीनचे पेरणीचे नियोजन विभागाकडून केले जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात अलीकडील काही वर्षांत खरीप हंगामातील सोयाबीन हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक झाले आहे. गेल्या तीन वर्षांतील जिल्ह्यातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ४१ हजार ८०३ हेक्टर आहे.

यंदाच्या (२०२३) खरिपात जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात पावसाचे असमान वितरण होत आहे. पेरणीनंतर पावसाचा खंड पडत आहे. कधी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सोयाबीनसह विविध पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे.

या परिस्थितीत बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीन पेरणीचे फायदे अनेक असल्याचे आढळून आले आहे. रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी केल्यास एकरी २२ किलोपर्यंत बियाणे लागते. सऱ्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी मुरुन मूलस्थानी जलसंधारण होते.

परिणामी, पावसाच्या खंडकाळात पीक तग धरून राहते. अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी सऱ्यावाटे वाहून जाते. पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादकता वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जाणकार शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.

कृषी विभाग तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी यंत्र शक्ती विभाग यांच्यातर्फे ट्रॅक्टर चालक-मालक यांच्यासाठी बीबीएफ पेरणी यंत्र जोडणी तसेच पेरणी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले जाते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे.

जिल्ह्यातील बीबीएफ पेरणी यंत्राची एकूण संख्या २४७ आहे. जिल्ह्यात २०२१ च्या खरिपात १३ हजार हेक्टरवर बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. गतवर्षी (२०२२) बीबीएफ यंत्राद्वारे २५ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन होते.

परंतु प्रत्यक्षात ६ हजार ७६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. येत्या खरिपात ८ हजार हेक्टरवर बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीसाठी कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे.

बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टर)

तालुका- बीबीएफ पेरणी यंत्र संख्या- २०२२ मधील पेरणी क्षेत्र- २०२३ मधील प्रस्तावित क्षेत्र

परभणी- ४५ - १२३३ - १५००

जिंतूर - ५२- १४२४- १६८०

सेलू- २३- ६३० - ७४०

मानवत - २२- ६०२- ७१०

पाथरी - २३ - ६३०- ७४०

सोनपेठ - २६ - ७१२ - ८४०

गंगाखेड - २१ - ५७६ - ६७०

पालम - १६- ४३९ - ५१०

पूर्णा - १९ - ५२० - ६१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT