Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farmers Issue : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली

Team Agrowon

Amravati News : सोयाबीन काढणी सुरू झाली असून, नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाले आहे. नव्या व जुन्या दोन्ही सोयाबीनला हमीदर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

या चिंतेत ढगाळ वातावरण व पावसाच्या भीतीने भर पडली आहे. मंगळवारी (ता. १५) येथील बाजार समितीत जुन्या सोयाबीनला ४२५० रुपये सरासरी भाव मिळाला. तर नवीन सोयाबीनसाठी खरेदीदारांनी सरासरी ४००० रुपये क्विंटल असा दर दिला.

खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला सुरुवात झाली. गत हंगामात दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला सोयाबीन दसऱ्याला बाजारात आणला. शासनाने सोयाबीनला ४८९३ रुपये हमीदर जाहीर केला असून, हमीदराने खरेदीचे निर्देश दिले आहेत.

गुरुवारी (ता. १०) येथील बाजार समितीत जुन्या सोयाबीनची ५३७२ पोत्यांची आवक झाली. या सोयाबीनला किमान ४१००, तर कमाल ४४६१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सरासरी ४२८० रुपये दर मिळाला. जुन्या सोयाबीनला मिळणारे दर व आगामी काळात येणाऱ्या नवीन सोयाबीनचे खरेदीदार जाहीर करत असलेले हमीदराखालील दर बघता शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk And Milk Project : परभणी जिल्ह्यातील ९ गावांमध्ये सिल्क आणि मिल्क प्रकल्प

Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

Orchard Cultivation : जलकुंड आधारित फळबाग लागवड वरदान

Grape Producer : द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवा

SCROLL FOR NEXT