Manchar Bazar Samiti  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Deputy Chairman Sachin Pansare : आंबेगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सोयाबीन खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यासाठी मंचर बाजार समिती प्रयत्न करेल.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सोयाबीन खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यासाठी मंचर बाजार समिती प्रयत्न करेल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

मंचर येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर व शेतकऱ्यांनी पानसरे यांची भेट घेऊन केली. या वेळी बाजार समितीचे संचालक अरुण बांगर, देवगावचे माजी सरपंच बाबाजी गावडे, शेतकरी संघटनेचे प्रकाश कोळेकर, संतोष पवार, वनाजी बांगर आदी शेतकरी उपस्थित होते.

प्रभाकर बांगर म्हणाले, ‘‘आंबेगाव तालुक्यात सध्या पाच हजार एकर क्षेत्रावर सोयाबीनचे उत्पादन घेतात. दर वर्षी सोयाबीन पीक लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. शासनाने सोयाबीनचा खरेदी दर ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे.

पण मंचर येथे सोयाबीन खरेदी केंद्र नसल्याने खाजगी व्यापारी ४ हजार ते ४ हजार १०० रुपये प्रती क्विंटल बाजार भावाने सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करतात. शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळण्यासाठी सोयाबीन खरेदी केंद्र बाजार समितीने सुरू करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच 

Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

Paddy Cultivation: दर्जेदार भात उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर

Karnataka Floods: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्नाटकात पीक नुकसानीची प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई

Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 

SCROLL FOR NEXT