Soybean Crop agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop : सोयाबीन उत्पादकांना मिळणार अर्थसाहाय्य, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून माहिती

Soybean Production : ज्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अॅप किंवा पोर्टलद्वारे नोंद केली आहे.

sandeep Shirguppe

Agriculture News : राज्यात २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये, तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर पाच हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात खरीप २०२३ मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन व कापूस पिकाची ई-पीक पाहणी नोंदविलेल्या सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेची माहिती कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडून मिळणार असल्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे.

पत्रकात म्हटले आहे, ज्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अॅप किंवा पोर्टलद्वारे नोंद केली आहे. असेच नोंदणीकृत शेतकरी या अर्थसाहाय्यासाठी पात्र राहतील. ई-पीक पाहणी अॅप, पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच रक्कम मिळणार आहे.

पोर्टलवर नोंद केलेल्या वैयक्तिक व सामायिक खातेदारांची गावनिहाय व तालुकानिहाय यादी क्षेत्रीय स्तरावर ९ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द केली आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या वैयक्तिक खातेदारांनी आधार संमतीपत्र व सामायिक खातेदारांनी नाहरकत पत्र व आधार संमतीपत्र क्षेत्रीय स्तरावर कृषी सहायक यांच्याकडे द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा दरासाठी आमदार अंबादास दानवेंचं समृद्धी महामार्गावर आंदोलन; पोलिसांनी दानवेंना घेतलं ताब्यात

India Economic Crisis: आर्थिक आपत्तीचे इशारे आणि शांत मध्यमवर्ग

Turmeric Farming: फिका रंग हळदीचा

Disaster Management: संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे : मित्तल

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT