Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market Crisis: सोयाबीनला आधीच दर मिळेना,आता भरला लुटीचा बाजार!

Farmer Issue: यंदा सोयाबीनला चार हजारांच्या आत दर मिळत असल्याने आधीच शेतकरी अडचणीत आलेला आहे. अशा स्थितीत शासनाची हमीभाव खरेदी योजना आधार ठरेल असे वाटत होते. मात् यासाठी सुरू असलेल्या काही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.

 गोपाल हागे

Akola News: यंदा सोयाबीनला चार हजारांच्या आत दर मिळत असल्याने आधीच शेतकरी अडचणीत आलेला आहे. अशा स्थितीत शासनाची हमीभाव खरेदी योजना आधार ठरेल असे वाटत होते. मात् यासाठी सुरू असलेल्या काही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. खरेदीदारांकडून शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या मालाच्या नोंदणीसाठी क्विंटलला १५० रुपयांची मागणी होत असल्याचा प्रकार एका ध्वनिफितीद्वारे (ऑडिओ क्लिप) समोर आला आहे.

सोयाबीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. खरेदी केंद्रावर मोठी गर्दी बघायला मिळते आहे. यामुळे आता काही खरेदीदार थेट पैशांची मागणी करीत शेतकऱ्यांकडून सोयाबीन मोजणी व त्यानंतर चुकाऱ्यांसाठी नोंदणीची प्रक्रिया करू लागले आहेत.

समोर आलेल्या या ध्वनिफीतीमध्ये खरेदीदार असलेला एजंट हा शेतकऱ्याशी संवाद साधताना पैसे देणार असाल तरच पुढील प्रक्रिया होऊ शकेल, अन्यथा तुमच्या मालाचे चुकारे न मिळाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही असे सांगत आहे. तर दुसरीकडे शेतकरी माझ्याकडे आता पैसे नसल्याचे त्याला सांगतो. मात्र ‘पैसे देणार असाल तरच पुढील कार्यवाही होईल, अन्यथा तुमचे तुम्ही बघा’ असा हा खरेदीदार शेतकऱ्याला बजावतो आहे. तुम्ही कुठेही जा.

पैसे द्यावेच लागतील, असेही सांगतो. एकूणच या ध्वनिफितीने जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीच्या प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. हमालीसह तब्बल २०० रुपये एका क्विंटलला हा खरेदीदार एजंट मागणी करीत आहे. सध्या व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात हमीभाव केंद्रावर विकला जात असल्याची खमंग चर्चाही रंगलेली आहे.

वास्तविक शासनाकडून हमीभावाने खरेदी करणाऱ्या शेतकरी कंपन्यांना एजंट म्हणून विशिष्ट रक्कम दिली जाते. असे असतानाही शेतकऱ्यांची केली जाणारी लूट चीड निर्माण करणारी आहे. बाजारपेठेत सोयाबीनचा दर सध्या ४ हजारांच्या आत आलेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेला ४८९२ रुपयांचा दर शासकीय खरेदी केंद्रावर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.

अद्यापही हजारो शेतकऱ्यांची खरेदी व्हायची आहे. प्रतीक्षा यादी मोठी असून, शेतकऱ्यांच्या या अवस्थेचा खरेदीदार एजंट गैरफायदा घेऊ लागले आहेत. आता गुरुवार (ता. ६)पर्यंत खरेदीची अंतिम मुदत आहे. सध्या सुरू असलेला हा लुटीचा बाजार थांबविण्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नाही. प्रशासनातील अधिकारी याबाबत काहीही बोलत नसून लोकप्रतिनिधीसुद्धा गप्प आहेत. खरेदीदार उघडपणे पैशांची मागणी करीत असल्याने एकूण या खरेदी प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहलेले आहे.

यंदा ना उत्पादकता, ना बाजारभाव

सोयाबीनला या वर्षी एकरी तीन क्विंटलपासून उत्पादन आले. एवढ्या उत्पादनात शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल झालेला नाही. अशात बाजारातही दर घसरलेले आहेत. आता स्वतःचा माल विक्रीसाठी हमाली तसेच अतिरिक्त पैसेही खरेदीदार एजंट आकारत असल्याने आर्थिक लूट मांडण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT