Amaravati News : यंदाच्या खरीप हंगामात कापूस व तुरीच्या क्षेत्रात घट तर सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने बियाण्यांसह खतांचे नियोजन केले आहे.
मागणीचा प्रस्ताव तयार झाला असला तरी त्यावर खरीप हंगाम आढावा बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. पुढील महिन्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत ही बैठक नियोजित आहे. यावर्षी सुमारे ६ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाचे नियोजन आहे. गतवर्षीच्या तुलनेत चार हजार हेक्टरने अधिक क्षेत्र पेरणीखाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कृषी विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात या अंदाजात क्षेत्राच्या अनुषंगाने बियाणे व खतांचे नियोजन करण्यात येऊन मागणीचे नियोजन करण्यात आले आहे.
आगामी खरिपात कापसाखाली २ लाख ४९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात पेरणी अंदाजित करण्यात आली असून, ८९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ७० हजार क्विंटल बियाणे सोयाबीनचे आहे.
बियाणे मागणी (क्विंटल)
कापूस ः ६ हजार, सोयाबीन ः ७० हजार, तूर ः ४ हजार २४०, मूग ः ७७, उडीद ः ११५
खतांची मागणी
खरीप हंगामातील पीक व पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने १ लाख ४३ हजार ६६९ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ३५ हजार ४०५, डीएपी ः २१ हजार २४४, एनओपी ः ४ हजार ५२०, एनपीके ः ४४ हजार ६००, एसएसपीए ः ३७,९०० टनांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.