Soybean Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Issue : सोयाबीन पडतेय पिवळे

Soybean Update : चांगल्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन पीक जोमात असताना ज्या भागात अधिक पाऊस झाला तेथे पीक पिवळे पडत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : चांगल्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन पीक जोमात असताना ज्या भागात अधिक पाऊस झाला तेथे पीक पिवळे पडत आहे. परिणामी, नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील काही भागांत हा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पिक पिवळे पडण्याबाबत मात्र कृषी विभागाने अजूनही दखल घेतल्याचे दिसत नाही.

राज्यातील बहुतांश भागात यंदा पाऊस चांगला आहे. सातत्याने पाऊस येत असून काही भागात अतिवृष्टी झाली. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. त्या भागात सोयाबीन पिवळे पडत असून फुले व शेंगाही पुरेसा लागलेल्या दिसत नाहीत.

गेल्या वर्षी अनेक भागात सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादनावरही परिणाम झाला होता. यंदाही गतवर्षीसारखेच सोयाबीन पिवळे पडत आहे. सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे वेगवेगळी कारणे असली तरी गतवर्षीसारखच यंदाही उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

मी पावसामुळे हे पीक पिवळे पडले असण्याचा आमचा अंदाज आहे. आम्ही तालुका कृषी कार्यालयाला कळवले, पण अजून शेतात पाहणी करायला कोणीही आले नाही, असे नेवासा खुर्द येथील शेतकरी राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले.

पिवळा मोझॅकमुळे झालेले नुकसान भरून काढता येत नाही. मोझॅकमुळे फुले, शेंगा कमी लागतात. त्यासाठी पांढरी माशी, मावा याचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. सोयाबीन पिकांत साचलेले पाणी तातडीने काढून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आमच्याशी संपर्क केला तर पाने पिवळी पडण्याची कारणे शोधून त्याचा प्रसार थांबवण्याबाबत उपाय सुचवता येतील.
डॉ. बापुसाहेब मुसमाडे, वरिष्ठ संशोधन सहायक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

Kharif Season Planning: निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा : पालकमंत्री फुंडकर

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

SCROLL FOR NEXT