Soybean Cotton Anudan  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ; शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा

E-Inauguration of Soybean and Cotton Subsidy Distribution: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी अनुदान वितरणाचा ई- शुभारंभ करण्यात आला.

Dhananjay Sanap

Government Subsidy For Farmers: सोयाबीन कापूस अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अनुदान आज (ता.३०) जमा करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी अनुदान वितरणाचा ई शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, आणि इतर मंत्री तसेच कृषी खात्याच्या सचिव जयश्री भोज आदि अधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारनं खरीप २०२३ च्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला. परंतु मागील दोन महिन्यापासून शेतकरी अनुदानाची वाट पाहत होते.

तर राज्य सरकारकडून तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू होता. अखेर तारीख पे तारीखचा खेळ संपला आहे. अनुदानाच्या पहिल्या टप्प्याचं वितरणाचा ई शुभारंभ मंत्रिमंडळ बैठकी करण्यात आला आहे.

पहिल्या टप्पात किती शेतकरी पात्र ?

राज्यातील ९६ लाख शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र ठरले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ६५ लाख शेतकऱ्यांना अनुदान पहिल्या टप्प्यात देण्यात येईल, असं सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात अनुदान जमा केले आहे.

अनुदान कधी जमा होणार?

पहिल्या टप्प्यातील अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तर शेतकऱ्याचे कागदपत्र जसजशी जमा होतील आणि आधारचं ई केवायसी पूर्ण होईल तसतसे अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी रविवारी (ता.२९) दिली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डीबीटी पद्धतीने अनुदान जमा करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT