Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : सोयाबीन-कापूस आंदोलन चिघळण्याची शक्यता

Ravikant Tupkar Protest : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी सरकारचा दबाव झुगारून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Team Agrowon

Buldhana News : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी सरकारचा दबाव झुगारून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. रविवारी (ता. २६) अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या आंदोलनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे.

शेतकरी चिखली तालुक्यातील सोमठाणा या आंदोलन स्थळी पोहोचत आहेत. राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून बुधवारी (ता. २९) मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या तुपकर यांनी केल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा शहर पोलिसांनी तुपकर यांना शनिवारी (ता. २५) अटक केली.

पोलिसांच्या या अन्यायकारक कारवाईमुळे राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राज्यभरात आंदोलनांचा धडाका सुरू झाला. दरम्यान, तुपकर यांना सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर तुपकार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.
रविकांत तुपकर, शेतकरी नेते

मुंबईला धडक देण्यासाठी आंदोलक सज्ज

‘‘शेतकरी आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव आहे. परंतु आता शेतकऱ्यांची फौज मागे वाटणार नाही. शेतकऱ्यांसाठी शहीद झालो तरी चालेल, परंतु आता मंत्रालयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेणारच,’’ असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. तुपकर यांच्या आवाहनानुसार, राज्यात गावा-गावातील कार्यकर्ते आणि शेतकरी मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज होत असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT