Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : सोयाबीनच्या पेरणीत १४ हजार हेक्टरने घट शक्य

Kharif Season 2025 : अलीकडील काही वर्षात जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या ३ वर्षातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ७१ हजार ८०९ हेक्टर आहे.

Team Agrowon

Parbhani News : उत्पादकता कमी झाली आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातुलनेत बाजारभाव कमी मिळत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ च्या तुलनेत यंदा (२०२५) मध्ये सोयाबीनच्या पेरणीत १४ हजार हेक्टरने घट शक्यता आहे.

यंदाच्या खरिपासाठी सोयाबीनच्या ७० हजार क्विंटल बियाण्याची मागणी महाबीज तसेच खासगी कंपन्यांकडे करण्यात आली. त्यापैकी ७० टक्के बियाण्याचा पुरवठा झाला आहे. बियाणे खरेदी विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर करावा असे जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी सांगितले.

अलीकडील काही वर्षात जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या ३ वर्षातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ७१ हजार ८०९ हेक्टर आहे. खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यात २ लाख ८० हजार ९०५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. परंतु विविध कारणांनी पेरणीत घट होऊन यंदा २ लाख ६६ हजार ६८० हेक्टरवर सोयाबीनची पेरणीची शक्यता आहे.

जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या ३ वर्षात सरासरी ६१ हजार २६८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. यंदाच्या खरिपातील प्रस्तावित क्षेत्रानुसार २ लाख १४५ क्विंटल बियाण्याची गरज आहे. प्रस्तावित बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्केनुसार ७० हजार ५१ क्विंटल बियाण्याची गरज आहे.

खरीप २०२४ ग्रामबिजोत्पादन मोहिमेद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वतःकडील राखून ठेवलेले मिळून एकूण १ लाख ३० हजार ९४ क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. त्याव्यतिरिक्त ७० हजार ५१ क्विंटल बियाण्याची मागणी सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा खरीप २०२५ सोयाबीन बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)

बियाणे उत्पादक मागणी

महाबीज ८०००

राष्ट्रीय बियाणे महामंडळ ६०००

ईगल ७५००

यशोदा ५५००

वसंतअॅग्रो ५५००

ग्रीन गोल्ड ६५००

एफपीओ ६०००

अंकुर ५५००

इतर सर्व १९,५२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

Maharashtra Corrupt Ministers: कलंकित, भ्रष्ट मंत्री, आमदारांची हकालपट्टी करा

Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

SCROLL FOR NEXT