Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Loan : सोयाबीनला हेक्टरी ७५ हजारांचे पीक कर्ज

Kharif Season Crop Loan : दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व खासगी क्षेत्रातील बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. पीक कर्जासाठी सरकारकडून व्याज सलवत योजना राबवण्यात येते.

Team Agrowon

Dharashiv News : शेती व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता पीक कर्जदरासाठी स्थापन जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने जिल्ह्यात चालू २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षात पीक कर्जाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी १५ टक्के वाढ केली आहे. यामुळे आता सोयाबीनला हेक्टरी ७५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.

यासोबत उसासाठीच्या पीक कर्ज दरातही वाढ झाली असून, उसाला हेक्टरी एक लाख ऐंशी हजाराचे कर्ज मिळणार आहे. तुती लागवडीसाठीही हेक्टरी एक लाख ८५ हजारापर्यंतचे कर्ज मिळणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास यांनी दिली.

दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व खासगी क्षेत्रातील बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. पीक कर्जासाठी सरकारकडून व्याज सलवत योजना राबवण्यात येते.

मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यासोबत बँकनिहाय कर्ज वाटपाचे दरवर्षी निश्‍चित केले जाते. यंदाही हे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून, खरीप व रब्बी हंगामात मिळून दोन हजार २८० कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

त्यापूर्वी राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून पिकांचे किमान व कमाल पीक कर्जदर दरवर्षी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार जिल्हा समिती दर निश्चित करते. यंदा तांत्रिक समितीने दर निश्चित करताना कर्जदरात पंधरा टक्के वाढ केली आहे.

त्यानुसारच चालू वर्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जुन्या दराने कर्ज घेतले असून, त्यांनी या कर्जाचे पुनरुज्जीवन केल्यानंतर त्यांनाही नवीन दराने कर्ज मिळणार आहे. खरीप व रब्बी हंगामातील सर्व पिकांसह फळबागा, भाजापीला, फुलशेती व बागायती पिकांसाठीही नव्याने पीककर्ज दर निश्चित करण्यात आले असून दराची माहिती शेतकऱ्यांना बँकेत मिळणार आहे.

यासोबत गाय, म्हैस, शेळी व कुक्कुटपालन तसेच मत्स्यपालनासाठीही कर्जदर निश्‍चित करण्यात आले आहेत. यात एका गाईसाठी तीस, तर एका म्हशीसाठी ३२ हजारांचे कर्ज आहे. शेळीपानसाठी ३५ हजार, तर कुक्कुटपालनासाठी ४६ हजारापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. मत्स्य व्यवसायासाठी ऐंशी हजारापर्यंत कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे श्री. दास यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षात नव्याने कर्ज घेणाऱ्या तसेच थकीत पिककर्जाचे पुनरुज्जीवन (रिनीव्हल) करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन दराने पीक कर्ज मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करुन नवीन कर्जाचे पैसे शेतीच्या कामाला हाती येणार आहे. यासोबत बँकेची कर्जवसुली होणार आहे. मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना व्याज सवलत योजनेचा फायदा मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या बँकेशी संपर्क करावा.
- चिन्मय दास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, धाराशिव

पीक मागील वर्षातील दर चालू वर्षातील दर

सोयीबीन ६४९०० ७५०००

कापूस ६९३०० ७५०००

हरभरा ३८५०० ४२३००

गहू ५०६०० ५५६००

ऊस पूर्वहंगामी १५५०४६ १७००००

ऊस सुरू १५७८७५ १७००००

ऊस आडसाली १६९९०४ १८००००

खोडवा १२३५८८ १५००००

द्राक्ष ४२५७०० ४६८२००

तुती लागवड १३३००० १८५०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mung Urid Threshing: मूग आणि उडीदाची मळणी करताना काय काळजी घ्यावी?

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ नका: उच्च न्यायालय

Farmer Payment: कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Turmeric Disease: हळदीवर कंदकुज रोगाचा धोका, नियंत्रणासाठी सोपे मार्गदर्शक उपाय

Cooperative Commissionerate: सावकारांनो, कर्ज देताना व्याजदराचा फलक लावा: सहकार आयुक्तालय

SCROLL FOR NEXT