Crop Loan: गेल्या वर्षी पीककर्ज वाटपाचा उच्चांक

Record Loan Distribution: पुणे जिल्ह्यामध्ये २०२४-२५ मधील आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना सात हजार ९२० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यात कर्जवाटपाचा उच्चांक झाला आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यामध्ये २०२४-२५ मधील आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना सात हजार ९२० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यात कर्जवाटपाचा उच्चांक झाला आहे. हे वाटप उद्दिष्टापेक्षाही अधिक झाले आहे. सर्वाधिक कर्ज देण्यात सरकारी बॅंका आघाडीवर आहेत.

या वर्षी सहा हजार ३७० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत एक हजार ९५० कोटी रुपये अधिक कर्जवाटप करून उद्दिष्टाच्या १२४ टक्के कामगिरी झाली आहे. यामध्ये मत्स्य व्यवसाय व पशुपालनासाठी २० कोटी रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

Crop Loan
Crop Loan Chaos: पेच कर्जवसुली अन् वाटपाचा!

जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहा हजार ९३० कोटी, तर त्यापूर्वी २०२२-२३ मध्ये पाच हजार २० कोटी रुपये पीककर्ज वाटप झाले होते. त्या अगोदर २०१५-१६ मध्ये तीन हजार ५०६ कोटी ३१ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते. त्यानंतर हा २०२१-२२ मध्ये मागचा उच्चांक मोडला आणि त्यानंतर सलग चार वर्षे पीककर्ज वाटपाचा नवीन विक्रम होत आहेत.

मागील चार वर्षे वार्षिक पतपुरवठा आराखडा योजनेनुसार ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पार करून जिल्ह्यात कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये ८३ हजार २९७ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रत्यक्षात दोन लाख पाच हजार २५९ कोटी, २०२२-२३ मध्ये एक लाख १७ हजार ७१६ कोटींच्या उद्दिष्टासमोर दोन लाख ७० हजार ९२५ कोटींचे आणि २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात तीन लाख एक हजार ६०० कोटींच्या उद्दिष्टासमोर दोन लाख ७३ हजार ९७ कोटी कर्जवाटप झाले.

Crop Loan
Crop Loan : अवघ्या २३ दिवसांत ३१४ कोटींचे कर्जवाटप

तर यावर्षी मार्चअखेर तीन लाख ५३ हजार ५२२ कोटींचे विक्रमी कर्जवाटप झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा तीन लाख ६२ हजार कोटींचा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बँका उद्दिष्ट (कोटीत) प्रत्यक्ष वाटप (कोटीत) टक्के

सरकारी बँका १८७१ ३४१३ १८२.४२

खासगी बँका १३१११ १५१० ११.५२

जिल्हा बँक ३१७५ २९९१ ९४.२०

एकूण ६३७० ७९२० १२४.३३

जिल्ह्यात या वर्षी सहा हजार ३७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर प्रत्यक्षात सात हजार ९२० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कृषी मुदत कर्जवाटपामध्येही नऊ हजार ४६० कोटी रुपये कर्जवाटप झाले असून पीककर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी ३१ मार्चपर्यंत एकूण १७ हजार ३८० कोटी रुपये कर्जवाटप करून १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.
योगेश पाटील, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com