Crop Loan : अवघ्या २३ दिवसांत ३१४ कोटींचे कर्जवाटप

Jalgaon DCC Bank : गेल्या वर्षाच्या तुलनेत कर्जवाटपात यंदा दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.
Jalgaon DCC Bank
Jalgaon DCC BankAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा अवघ्या २३ दिवसांत तब्बल ३१४ कोटींचे कर्जवाटप केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कर्जवाटपात यंदा दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेने यंदा ‘व्याजमाफी’ची घोषणा केल्यामुळे कर्जाची विक्रमी वसुली झाली. ज्या वेगाने वसुली झाली तितक्याच वेगाने जिल्हा बँकेने कर्जवाटपाला देखील सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, नागरी, खासगी बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दरवर्षी विक्रमी कर्जवाटप केले जाते.

Jalgaon DCC Bank
Crop Loan Target : पीककर्ज वाटपाचे बँकनिहाय उद्दिष्ट निश्चित

यावर्षी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक त्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी जिल्हा बँकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच कर्जवाटप सुरू झाले आणि अवघ्या २३ दिवसांत ३१४ कोटी रुपयांचे वाटप करून बँकेने गतवर्षीचा विक्रम मोडीत काढला.

Jalgaon DCC Bank
Crop Loan Recovery: खानदेशात बँकांकडून सक्तीची पीककर्ज वसुली

गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाटप

गतवर्षी याच कालावधीत सुमारे १६६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले होते. मात्र यंदा ही रक्कम दुप्पटीने वाढून ३१४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही भरघोस वाढ कृषी क्षेत्रासाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवत आहेत.

त्यासाठी त्यांना भांडवली मदतीची नितांत आवश्यकता असते, जी जिल्हा बँकेने वेळीच उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये सुलभ कर्जप्रक्रिया, कमी दस्तऐवजीकरण, डिजिटल साक्षरतेचा प्रसार आणि थेट खात्यावर रकमेचा जमा करून देण्यात येत आहेत.

असे झाले कर्जवाटप (१ ते २३ एप्रिल २०२५)

प्रकार सभासद संख्या कर्ज रक्कम

थेट बँकेमार्फत ५,८२९ ४४ कोटी ५ लाख

वि. का. सोसायटी ३६,५५२ २७० कोटी १८ लाख

एकूण ४२,३८१ ३१४ कोटी २३ लाख

सन २०२४ मधील कर्जवाटप

प्रकार सभासद संख्या कर्ज रक्कम

थेट बँकेमार्फत ९२२ ६ कोटी ७५ लाख

वि. का. सोसायटी २३,३२५ १५९ कोटी ६८ लाख

एकूण २४,२४७ १६६.४३ कोटी

शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी, ही आमची प्राथमिकता आहे. बँकेच्या सर्व शाखांनी या कामात सहकार्य करून अवघ्या २३ दिवसांत ४२ हजार ३८१ शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पोहोचविले, ही आमच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची पावती आहे. आगामी काळात अजून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- संजय पवार, अध्यक्ष, जिल्हा बँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com