Sowing update Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain Update : खानदेशात पेरण्यांना सुरुवात

Pulses, Cotton Cultivation : खानदेशात काही भागांत बऱ्यापैकी किंवा कडधान्य, कापूस लागवडीयोग्य पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात काही भागांत बऱ्यापैकी किंवा कडधान्य, कापूस लागवडीयोग्य पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता.२९) व शुक्रवारी (ता. ३०) पेरण्या सुरू होत्या. खानदेशात सुमारे १५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर, धुळ्यात चार लाख आणि नंदुरबारात सुमारे अडीच लाख हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी होईल. यात कापसाची सुमारे साडेआठ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे.

पूर्वहंगामी कापसाची खानदेशात लागवड पूर्ण झाली असून, ही लागवड एक लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर कापूस, धुळ्यात दोन लाख हेक्टर आणि नंदुरबारात एक लाख १० हजार हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे.

कोरडवाहू कापसाची लागवड मंगळवारपर्यंत (ता. २७) अपवाद वगळता सुरू झालेली नव्हती. परंतु गुरुवारी कापूस, तृणधान्य, ज्वारी, मका, बाजरीची पेरणी सुरू झाली. सोयाबीनची पेरणी मात्र अनेकांनी टाळली आहे. कारण खानदेशात कुठेही एकाच दिवसात ३० ते ४० मिलिमीटर पाऊस अद्याप झालेला नाही.

पाऊसमान या महिन्यात कमीच आहे. यामुळे पेरण्या रखडल्या. मागील वर्षी पेरण्या १५ जूनपर्यंत बऱ्यापैकी पूर्ण झाल्या होत्या. परंतु यंदा पेरण्यांना पावसाअभावी फटका बसला आहे. कापूस लागवड मागील हंगामाच्या तुलनेत १० टक्के कमी होऊ शकते. जळगाव जिल्ह्यात मागील वेळेस पाच लाख ६७ हजार हेक्टरवर कापूस लागवड कमी झाली होती.

यंदा ही लागवड साडेपाच लाख हेक्टरपर्यंत असू शकते. परंतु ज्वारी, बाजरी, मका, तूर यांचे क्षेत्र किंचित वाढू शकते. तूर लागवडीसही अनेक शेतकरी पसंती देत आहेत. कारण तूर उत्पादन मागील वेळेस बऱ्यापैकी होते. तसेच दरही साडेसहा हजार ते अखेरीस साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल, असे शेतकऱ्यांना मिळाले होते.

गुरुवारचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) - धुळे ११, साक्री १८. जळगाव १५, धरणगाव १६, चोपडा १६

गुरुवारी बरसला

खानदेशात आषाढीला म्हणजेच गुरुवारी अनेक भागांत चांगला पाऊस झाला. धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री, जळगावमधील धरणगाव, जळगाव, चोपडा, यावल, एरंडोल, नंदुरबारात नवापूर भागात बऱ्यापैकी पाऊस झाला.

दिवसभर मध्यम ते हलका पाऊस सुरू होता. सायंकाळी अनेक भागात जोरदार पाऊस आला. पण हा पाऊस सर्वत्र नव्हता. परंतु पावसाने हजेरी लावल्याचे लक्षात घेता पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Flour Export : केंद्र सरकार सेंद्रिय गव्हाच्या पीठ निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता

Bihar Government Formation: पुन्हा तेच त्रिकूट! बिहारचा मुख्यमंत्री ठरला; NDA सरकारमध्ये असणार दोन उपमुख्यमंत्री

Cotton Production Issue: कारंजा तालुक्यात कपाशीची दोन वेचणीतच उलंगवाडी

Local Body Polls: निवडणुकीत नेत्यांचा नातेवाईकांवरच विश्वास

Agriculture Storage: साठवणुकीत तापमान आणि आर्द्रता का महत्त्वाची?

SCROLL FOR NEXT