Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farming : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीनचा ५ लाख हेक्टरवर पेरा

Soybean Sowing : यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. २) सोयाबीनची परभणी जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ६५८ हेक्टर (११०.७८ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख ४४ हजार १३३ हेक्टरवर (९५.२१ टक्के) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची यंदाही सोयाबीनला अधिक पसंती कायम आहे. यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. २) सोयाबीनची परभणी जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ६५८ हेक्टर (११०.७८ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख ४४ हजार १३३ हेक्टरवर (९५.२१ टक्के) पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यात सोयाबीनची एकूण ५ लाख २० हजार ७९१ हेक्टरवर पेरणी झाली असून ८ तालुक्यांमध्ये सोयाबीनच्या पेरणीने सरासरी क्षेत्राचा टप्पा ओलांडला तर ६ तालुक्यांमध्ये सरासरीहून कमी पेरा झाला आहे.

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार शुक्रवारपर्यंत (ता. २) परभणी जिल्ह्यात एकूण खरिपाची ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ५ लाख २२ हजार ५२८ हेक्टरवर (९७.६३ टक्के) पेरणी झाली. त्यात सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी २ लाख ७७ हजार ६६ हेक्टरवर (११०.७८टक्के) पेरणी झाली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पू्र्णा या तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली.

गंगाखेड तालुक्यांत सरासरीएवढी तर पालम तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली. सोयाबीनसह तीळ, कारळे आदी गळित धान्यांची एकूण २ लाख ७६ हजार ७९१ हेक्टरवर (११०.५ टक्के) पेरणी झाली. ज्वारी, बाजरी, मका आदी तृणधान्यांची मिळून ९ हजार ८३१ पैकी १ हजार ८९० हेक्टरवर (१९.२३ टक्के) पेरणी झाली. तूर, मूग, उडीद आदी कडधान्यांची मिळून ८२ हजार ३७५ पैकी ४५ हजार ९८४ हेक्टर (५५.८२ टक्के) पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ९७ हजार ५३१ हेक्टर (१०२.७७ टक्के) लागवड झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख २३ हजार ६८८ हेक्टरवर (८९.६५ टक्के) पेरणी झाली. सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ४४ हजार १३३ हेक्टर (९५.२१ टक्के) पेरणी झाली.

वसमत तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त तर हिंगोली, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यांत कमी पेरणी झाली. एकूण गळित धान्यांची २ लाख ५६ हजार ४९५ पैकी २ लाख ४४ हजार १७१ हेक्टर (९५.२० टक्के) पेरणी झाली. ज्वारी, बाजरी, मका आदी तृणधान्यांची ६ हजार ७४५ पैकी ३ हजार ४४ हेक्टर (४५.१३ टक्के) तूर, मूग, उडीद आदी कडधान्यांची ५८,९९३ पैकी ४१,९८२ हेक्टर (७१.१२ टक्के) पेरणी झाली. कपाशीची ३८,८२१ पैकी ३४,४९१ हेक्टर (८८.८५ टक्के) लागवड झाली.

Soybean Sowing Condition

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT