Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : यवतमाळमध्ये दहा हजार हेक्टरवर खरीप पेरा

Kharif Season 2025 : शेतकऱ्यांनी पेरण्याची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. मात्र, अद्याप लागवडी योग्य पाऊस जिल्ह्यात झाला नाही.

Team Agrowon

Yavatmal News : शेतकऱ्यांनी पेरण्याची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. मात्र, अद्याप लागवडी योग्य पाऊस जिल्ह्यात झाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांकडे लक्ष दिले नाही. तरीसुद्धा नऊ हजार ८२३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यानंतरच प्रत्यक्षात पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

यंदा सरासरी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यात नऊ लाख हेक्टरवर सोळा हजार हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. कधी नव्हे तर यंदा मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला. मॉन्सूनपूर्व पावसामुळे वातावरण पूर्णतः बदललेले होते.

मात्र, मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. शेतीच्या मशागती शेतकऱ्यांनी करून ठेवल्या असून, बी-बियाणे, खते, कीटकनाशक शेतकऱ्यांनी खरेदी करून ठेवले आहे.

मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झालाच नाही. मॉन्सून लागून दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. अद्याप जिल्ह्याभरात मॉन्सून सक्रिय झालाच नाही. शंभर मिमी पाऊस कोसळल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

साडेनऊ हजार हेक्टरवर कापसाची लागवड

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सर्वाधिक कापसाच्या पेऱ्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने बियाण्यांचे नियोजनसुद्धा कृषी विभागाने केले आहे. आजघडीस झालेल्या पेरण्यांमध्ये सर्वाधिक नऊ हजार ४५३ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.

सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांना अडचणी जाणार नाही. परंतु सिंचनाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. आठवडाभरात पाऊस न झाल्यास पेरणी केलेल्या शेतकरऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : शेतीपूरक विविध योजनांचा लाभ घ्या

Cooperative Bank Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला पुरस्कार

Electricity Connection : मराठवाड्यात वर्षभरात सव्वा लाख नवीन वीज जोडण्या

Water Crisis Maharashtra : मराठवाड्यातील ११ लघू प्रकल्प अजूनही कोरडे

Green Revolution: शेतकऱ्यांनी उभे केले घनदाट जंगल...

SCROLL FOR NEXT