Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season 2025 : यंदाच्या खरिपात कपाशीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील सर्वसाधारण ६ लाख ८१ हजार ९०३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख २६ हजार ७४९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. म्हणजे सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत ३३.२५ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे.

यंदाच्या खरिपात कपाशीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ८८ हजार ५३३ हेक्टर आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

त्या तुलनेत प्रतीक्षा २८.८५ टक्के म्हणजे १ लाख १२ हजार ८२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. कपाशी पाठोपाठ महत्त्वाचे पीक असलेल्या मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८५ हजार ६८२ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८३,६६० हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४५ टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : जूनच्या मध्यावरही केवळ चार टक्केच पेरणी

बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र २२१२८ हेक्टर असताना प्रत्यक्ष २७२३ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे.

मुगाची सर्वसाधारण ११ हजार ७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४८६७ हेक्टर, उडदाच्या ३६९१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६४३ हेक्टरवर, सोयाबीनची २७,८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७१०१ हेक्टरवर, भुईमुगाची ६३८५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २५४३ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com