Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार हेक्टरवर पेरणी

Sowing Update : बीड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासून अनेक भागात झालेल्या मध्यम दमदार ते जोरदार पावसामुळे खरीप पेरणीची गती वाढली आहे.

Team Agrowon

Beed News : बीड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासून अनेक भागात झालेल्या मध्यम दमदार ते जोरदार पावसामुळे खरीप पेरणीची गती वाढली आहे. बुधवार (ता. १२) अखेरपर्यंत जिल्ह्यात जवळपास ३८ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.

या संदर्भात अधिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यात १२ जूनपर्यंत सरासरी ५१.४ मिलिमीटरच्या तुलनेत ११२.७ मिलिमीटर पाऊस झाला. जो सरासरीच्या तुलनेत २१९.३ टक्के इतका आहे. सर्वात कमी पाऊस वडवणी तालुक्यात ७४.८ मिलिमीटर तर सर्वात जास्त पाऊस गेवराई तालुक्यातील १५९ मिलिमीटर झाला आहे. ४ जून पासून जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पावसाची हजेरी समाधानकारक राहिली आहे.

जिल्ह्यातील कडा, दौलावडगाव, जातेगाव, धोंडराई, अंबाजोगाई, घाटनांदुर, धर्मापुरी व मोहखेड या आठ महसूल मंडमांत अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सात लाख ८५ हजार ७८६ हेक्टर असून त्या तुलनेत प्रत्यक्षात १२ जून अखेरपर्यंत ३८ हजार ५९६ हेक्‍टरवर म्हणजे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ४.९१ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

पीकनिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

बाजरी : जिल्ह्यात बाजरीचे सरासरी क्षेत्र ६९,४८५ हेक्टर असून आतापर्यंत २७९ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे.

तूर : तुरीचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ५३,२३८ हेक्टर असून प्रत्यक्ष ८०५ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दोन टक्के इतकीच आहे.

मूग : जिल्ह्यात मुगाचे सरासरी क्षेत्र २१,८७६ हेक्टर असून आतापर्यंत १८० हेक्टर क्षेत्रावर मोगाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ एक टक्का आहे.

उडीद : जिल्ह्यात उडिदाचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८३८ सेक्टर असून आतापर्यंत ६१ हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली आहे.

सोयाबीन : जिल्ह्याचे सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख २६ हजार २३४ हेक्टर असून आतापर्यंत ५४४० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ दोन टक्के इतकी आहे.

कपाशी : कपाशीचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५५ हजार ४९४ हेक्टर असून आतापर्यंत ३१ हजार ८२० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्के इतकी आहे.

७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याखेरीज पेरणी करू नये. पेरणी करण्यापूर्वी बियाणाची उगम क्षमता घरच्या घरी तपासून घ्यावी. बियाणास बुरशीनाशक, कीटकनाशक व जैविक बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन सारखी पिके वरंब्यावर टोकन करून लागवड करावी. विशिष्ट कंपनीचे वाण ग्रेड यांचा आग्रह ठेवू नये. माती परीक्षण अथवा गावाच्या सुपीकता निर्देशांकाच्या आधारे खत उपाययोजना करावी. केवळ युरियाचा वापर टाळावा. आता नॅनो स्वरूपातही खते उपलब्ध आहेत.
बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT