Summer Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Soybean Sowing : उन्हाळी सोयाबीनची १०९५ हेक्टरवर पेरणी

Summer Crop : यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात गुरुवार (ता. ७) पर्यंत उन्हाळी सोयाबीनची परभणी जिल्ह्यात ३३७ हेक्टर (१२.६६ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ७५८ हेक्टर (९.०३ टक्के) पेरणी झाली आहे.

माणिक रासवे

Parbhani News : यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात गुरुवार (ता. ७) पर्यंत उन्हाळी सोयाबीनची परभणी जिल्ह्यात ३३७ हेक्टर (१२.६६ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ७५८ हेक्टर (९.०३ टक्के) पेरणी झाली आहे.

या दोन जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची १ हजार ९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर एकूण उन्हाळी पिकांची परभणी जिल्ह्यात २ हजार १५८ हेक्टर (१९.६९ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ११ हजार ३६ हेक्टर (४१.८९ टक्के) असे दोन जिल्ह्यांत मिळून १३ हजार १९४.८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

मागील तीन, चार वर्षांत खरिपातील सोयाबीन अतिवृष्टीत भिजून उगवण शक्तीवर परिणाम होत असल्यामुळे बियाण्यासाठी उन्हाळी हंगामात सोयाबीनचे बीजोत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. परंतु यंदा दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. तसेच सोयाबीनचे बाजारभाव देखील कमी आहेत.

त्यामुळे यंदा या दोन जिल्ह्यांत उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी घट झाली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा या चार व हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या तीन तालुक्यांत उन्हाळी सोयाबीनीच पेरणी झाली आहे.

परभणी, हिंगोली जिल्हे उन्हाळी सोयाबीन पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) गुरुवार (ता. ७) पर्यंत

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

जिंतूर १५१० २९ १.५२

मानवत ३१.७३ ७४ २३३.२२

पाथरी १७.३३ ६८ ३९२.८८

पूर्णा १५.२५ १७२ ११२७.८७

कळमनुरी ५९५ १४३ २४.०३

औंढानागनाथ ६४८ ५७० ८७.८७

सेनगाव २०९२ ४५ २.१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

Cotton Farming: कपाशीच्या शाश्‍वत उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

SCROLL FOR NEXT