Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : उन्हाळी कडधान्यांची ४३८ हेक्टरवर पेरणी

Sowing Update : परभणी -हिंगोली जिल्हयात यावर्षीच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. २९) पर्यंत कडधान्यांची ४३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी -हिंगोली जिल्हयात यावर्षीच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. २९) पर्यंत कडधान्यांची ४३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात उन्हाळी मुगाची पेरणी २९५ हेक्टर व उन्हाळी उडदाच्या १४३ पेरणीचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पीकांचे सरासरी १० हजार ९५८ हेक्टर आहे.शुक्रवार (ता. २९) पर्यंत ४ हजार ९६७ हेक्टरवर (४५.३३ टक्के) पेरणी झाली आहे.

कडधान्यांची ४९.०७ पैकी ५ हेक्टर (१०.१९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात मुगाची ३२.४ पैकी ४ हेक्टर (१२.३५ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी ६७२ हेक्टर (४७.०८ टक्के) पेरणी झाली.

त्यात मक्याची १ हजार ३७७ पैकी ४७९ हेक्टर (३४.७९ टक्के),ज्वारीची ५९.५ हेक्टर, बाजरीची ५०.२७ पैकी १३३ हेक्टर पेरणी झाली आहे. गळित धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ४ हजार २९१ हेक्टरवर (४५.२६ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ३ हजार १३६ हेक्टर (४६.१५ टक्के), सोयाबीनची २ हजार ६६२ पैकी १ हजार १४९ हेक्टर (४३.१५टक्के), तिळाची ११.२४ पैकी २ हेक्टर (१७.७९ टक्के) तर सुर्यफुलाची ४ हेक्टर (११.२४ टक्के पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता.२३) पर्यंत ११ हजार ६७४ हेक्टरवर (४४.३० टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी ४३४ हेक्टर (७.८५ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी २९१ हेक्टर (१५.२१ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १४३ हेक्टर (४.०३ टक्के) पेरणी झाली.

तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी ५३९ हेक्टरवर (४.३९ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १ हजार ९५ पैकी २८२ हेक्टर (२५.७५ टक्के), मक्याची १ हजार २ पैकी २५७ हेक्टर (२५.६२ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी १० हजार ७०० हेक्टरवर (७२.७३ टक्के) पेरणी झाली. उन्हाळी भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६ हजार ४६३.९९ असतांना ९ हजार ९३२.८२ हेक्टर (१५३.६६टक्के) पेरणी झाली. सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ७६८ हेक्टर (९.१५ टक्के) पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT