Mumbai News: शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणासाठी २०२५-२९ या कालावधीसाठी ५०० रुपये कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यंदाच्या वर्षांमध्ये ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरात कृषिमंत्री भरणे यांनी विधानसभेत दिली. तसेच ‘एआय’ धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी त्याचा कार्यभार उपसचिवाकडे दिल्याचेही मान्य केले..कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या अंमलबजावणी बाबत भोकरदनचे आमदार संतोष दानवे, समाधान अवताडे, अनिल पाटील, मनोज कायंदे, रोहित पवार, भास्कर जाधव, अमिन पटेल या सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. ‘‘राज्यात कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित धोरण राबविण्यासाठी निवडण्यात आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रुजू होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे..Ai in Agriculture: ‘एआय’ ऊस शेतीचा महाराष्ट्राबाहेरही विस्तार.जून २०२५ मध्ये पारदर्शक निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रशासकीय स्तरावरील अटींच्या पूर्ततेअभावी पात्र तज्ज्ञांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे या पदाचा कार्यभार उपसचिवांकडे सोपविण्यात आला आहे हे खरे आहे का?, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली असूनही केवळ धोरण आणि तांत्रिक मनुष्यबळाअभावी या निधीचा विनियोग संथ गतीने होत आहे हे खरे आहे का,’’ असा प्रश्न उपस्थित केला..AI in Agriculture: स्थानिक बोली भाषांवर आधारित ‘एआय’ करेल शेती सोपी.यावरील उत्तरात कृषिमंत्री भरणे म्हणाले, की निवड प्रक्रियेत अंतिम यादीतील उमेदवारांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला ही बाब खरी नाही. मात्र व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार उपसचिवांकडे देण्यात आलेला आहे. या योजनेसाठी २०२५-२९ या कालावधीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी २०२५-२६ साठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या धोरणांतर्गत अन्य तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करून अंमलबजावणी समाधानकारकरीत्या सुरू असल्याचे सांगितले..निधी खर्चाचा आकडा नाहीकृषिमंत्री भरणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, यापैकी किती निधी खर्च झाला या बाबतची आकडेवारी मात्र देण्यात आलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.