Ambegaon News: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची सध्या गहू मळणीची लगबग सुरू झाली आहे. तसेच गव्हाची लवकर कापणी करण्यासाठी हार्वेस्टर मशिनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे..पारंपरिक पद्धतीने शेतातील गहू काढण्याकरिता लागणारा वेळ पाहता या हार्वेस्टर मशिनने ते केवळ तासाभरात होऊ लागल्याने मजुरांचा वाढता तुटवडा, तसेच वाढलेली मजुरी या कारणांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी यांत्रिकीकरणाला पसंती देऊ लागला आहे.\.Pune Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला सुरूवात.हार्वेस्टरमुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीत कमी वेळात पिकांची मळणी करून धान्य घरी आणण्याच्या गडबडीत आहेत. या मशिनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाल्याने एक एकराचे काम अर्ध्या तासात होत आहे..Wheat Harvesting: सुगीमध्ये शेतकरी कुटुंबे झाली मग्न.पारंपरिक पद्धतीने गहू काढण्यासाठी एका एकराला दहा ते बारा महिला मजुरांची आवश्यकता भासते. तसेच त्यांना चार हजार रुपयांपर्यंत मजुरी लागते. त्यात गहू मळणीकरिता लागणाऱ्या मजुरांची मजुरी वेगळीच असते..परंतु हार्वेस्टर मशीनमुळे एक एकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्ध्या तासात काढून होतो. तसेच एकरी सरासरी १० ते १२ क्विंटल गहू उत्पादन होतो, असे पोंदेवाडी येथील गहू उत्पादक नीलेश पडवळ यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.