Summer Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : उन्हाळी पिकांची १६ हजार हेक्टरवर पेरणी

Summer Crop Update : शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाला सर्वाधिक पसंती दिली असून, या दोन जिल्ह्यांत उन्हाळी भुईमुगाची १३ हजार ३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. १५) पर्यंत उन्हाळी पिकांची परभणी जिल्ह्यात ४ हजार ८५५ हेक्टर (४४.३० टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ११ हजार ६७४ हेक्टर (४४.३० टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून १६ हजार ५२९ हेक्टरवरील पेरणीची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाला सर्वाधिक पसंती दिली असून, या दोन जिल्ह्यांत उन्हाळी भुईमुगाची १३ हजार ३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी १० हजार ९५८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. १५)पर्यंत ४ हजार ८५५ हेक्टरवर (४४.३० टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ४ हजार २४५ हेक्टरवर (४४.७७ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ३ हजार १०१ हेक्टर (४५.६३ टक्के), सोयाबीनची २ हजार ६६२ पैकी १ हजार १३८ हेक्टर (४२.७३ टक्के),

तिळाची ११.२४ पैकी २ हेक्टर (१७.७९ टक्के), तर सूर्यफुलाची ४ हेक्टर पेरणी झाली आहे. कडधान्यांची ४९.०७ पैकी ५ हेक्टर (१०.१९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात मुगाची ३२.४ पैकी ५ हेक्टर (१५.४३ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी ६०५ हेक्टर (१६.६० टक्के) पेरणी झाली. त्यात मक्याची १ हजार ३७७ पैकी ४२५ हेक्टर (३०.८७ टक्के),बाजरीची ५०.२७ पैकी १३५ हेक्टर (२७०.३४ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची सरासरीपेक्षा जास्त पेरणी...

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. १५) पर्यंत ११ हजार ६७४ हेक्टरवर (४४.३० टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी १० हजार ७०० हेक्टरवर (७२.७३ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ४६३.९९ पैकी ९ हजार ९३२ हेक्टर (१५३.६६ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ७६८ हेक्टर (९.१५ टक्के) पेरणी झाली आहे.

कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी ४३४ हेक्टर (७.८५ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी २९१ हेक्टर (१५.२१ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १४३ हेक्टर (४.०३ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी ५३९ हेक्टरवर (४.३९ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १ हजार ९५ पैकी २८२ हेक्टर (२५.७५ टक्के), मक्याची १ हजार २ पैकी २५७ हेक्टर (२५.६२ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी हिंगोली जिल्हा उन्हाळी हंगाम

२०२४ पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार (ता. १५)पर्यंत

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ३१०० १३३ ४.२९

जिंतूर ३९७५ २७४२ ६८.९८

सेलू .२८० ७१ २५.३०

मानवत ५५८ ४११ ७३.५६

पाथरी .४२२ २६२ ६१.९९

सोनपेठ ४५९ १९५ ४२.४८

गंगाखेड ५८५ ८६ १४.६८

पालम ३१२ १६२ ५१.९२

पूर्णा १२६३ ७९० ६२.५४

हिंगोली २७८१ ८० २.८७

कळमनुरी १९८५ ७५५ ३८.०३

वसमत १३२६४ १९७८ १४.९१

औढानागनाथ २१२० ६३७० ३००.४७

सेनगाव ६१९६ २४८९ ४०.१७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT