Summer Sowing : लातूर विभागात सरासरीच्या ४९ टक्के उन्हाळी पिके

Summer Crop : विभागातील पाचही जिल्ह्यांत उन्हाळी पिकांची जवळपास ३५ हजार ३३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Summer Sowing
Summer Sowing Agrowon

Latur News : विभागातील पाचही जिल्ह्यांत उन्हाळी पिकांची जवळपास ३५ हजार ३३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाचही जिल्ह्यांचे उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर असून झालेली पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४९ टक्के आहे.

लातूर विभागातील रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर आहे. प्रत्यक्ष १५ लाख ९२ हजार ५८६ हेक्टर म्हणजे सरासरीच्या तुलनेत ११६ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती.

त्यापैकी ज्वारीची काढणी पूर्ण झाली. गव्हाची काढणी काही ठिकाणी पूर्ण तर सुरू आहे. हरभऱ्याची काढणी ७० ते ७५ टक्के पूर्ण झाली आहे. करडईचे पीक सध्या पक्वतेच्या ते काढणी अवस्थेत आहे.

Summer Sowing
Summer Sowing : पाच जिल्ह्यात २४ हजार हेक्टरवर उन्हाळी पेरणी

पाचही जिल्ह्यांत उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर असून प्रत्यक्षात ३५ हजार ३३१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक उन्हाळी भुईमुगाला पसंती दिली आहे. जवळपास १८ हजार ७५९ हेक्टरवर भुईमूग आहे.

Summer Sowing
Summer Sowing : उन्हाळी पेरण्यांना सुरुवात

या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर आहे. झालेली पेरणी सरासरीच्या तुलनेत ७१ टक्के आहे. भुईमूग सध्या उगवणीच्या ते रोपे अवस्थेत आहे. उन्हाळी मका क्षेत्र ८०५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४२६७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी ५२ टक्के आहे.

जिल्हानिहाय उन्हाळी पेरणी क्षेत्र (हेक्टर)

जिल्हा...सरासरी...प्रत्यक्ष...टक्केवारी

लातूर...२३९६...८२०...३४

धाराशिव...९५५५...९७१...१०.१६

नांदेड...२२४४१...२०२४५...९०.६६

परभणी...१०९५८.८३...२१५८...१९.६९

हिंगोली...२६३४८...११०३६.८२...४१.८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com