Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : सोयाबीनचा ४ लाख ४७ हजारांवर हेक्टरवर पेरा

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार (ता. ५)पर्यंत सोयाबीनची परभणी जिल्ह्यात २ लाख २२ हजार ४६८ हेक्टर (८९.०८ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख २५ हजार २२७ हेक्टरवर (८७.८१ टक्के) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार (ता. ५)पर्यंत सोयाबीनची परभणी जिल्ह्यात २ लाख २२ हजार ४६८ हेक्टर (८९.०८ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख २५ हजार २२७ हेक्टरवर (८७.८१ टक्के) पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यांत सोयाबीनची एकूण ४ लाख ४७ हजार ६९५ हेक्टरवर, तर एकूण खरिपाची ७ लाख ३९ हजार ७१४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेतील पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सरासरी ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ४ लाख ४० हजार ५२६ हेक्टरवर (८२.३६) टक्के पेरणी झाली. त्यात सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी २ लाख २२ हजार ४६८ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ८३ हजार ६२७ हेक्टर (९५.५३ टक्के) लागवड झाली आहे. तुरीची ४५ हजार ९५९ पैकी २७ हजार ४४० हेक्टर (५९.७१ टक्के), मुगाची २७ हजार १७८ पैकी ४ हजार ४७५ हेक्टर (१६.४७ टक्के), उडदाची ९ हजार ८० पैकी १ हजार १०७ हेक्टरवर (१२.२० टक्के) पेरणी झाली. एकूण कडधान्याची ८२ हजार ३७५ पैकी ३३ हजार ५९ हेक्टरवर (४०.१३ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी ७३५ हेक्टर (१०.०३ टक्के),

बाजरीची १ हजार १६७ पैकी १३९ हेक्टर (११.९ टक्के), मक्याची १ हजार ३ पैकी ३६८ हेक्टर (३६.६६ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सरासरी ३ लाख ६० हजार ५४ पैकी २ लाख ९९ हजार १८७ हेक्टरवर (८२.८६ टक्के) पेरणी झाली. त्यात सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख २५ हजार १७४ हेक्टरवर (८७.८१ टक्के) पेरणी झाली. कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी ३३ हजार ६७९ हेक्टरवर (८६.७५ टक्के) लागवड झाली. तुरीची ४५ हजार ३०६ पैकी २९ हजार १९० हेक्टर (६४.४३ टक्के),

मुगाची ७ हजार ७८१ पैकी ४ हजार ८४५ हेक्टर (६२.२६ टक्के), उडदाची ५ हजार ८७९ पैकी ३ हजार १९९ हेक्टर (५४.४१ टक्के) पेरणी झाली. एकूण कडधान्यांची ५८ हजार ९९३ पैकी ३७ हजार ३१६ हेक्टर (६३.२५ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ५ हजार ५०५ पैकी २ हजार ४८६ हेक्टर (४५.१६ टक्के), मक्याची १ हजार २१८ पैकी ४१९ हेक्टर (३४.३८ टक्के) पेरणी झाली आहे.

सोयाबीन पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार, ता. ५ पर्यंत

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५००० ५१४२७ १०२.८५

जिंतूर ५०३२० ४१२५४ ८१.९८

सेलू १८७४४ १६९६७ ९०.५२

मानवत १४७५६ ८९४४ ६०.६१

पाथरी १६५२४ १५७४२ ९५.२७

सोनपेठ १३६७५ १३७७९ १००.७६

गंगाखेड २६२५८ २४२०० ९२.१६

पालम २३३६५ १८६५३ ७९.८३

पूर्णा ३६०८३ ३१५०२ ८७.३०

हिंगोली ६२०१५ ५१४८३ ८३.०२

कळमनुरी ५२४३२ ४३४५१ ८२.८७

वसमत ३३३२३ ३७२७५ १११.८

औंढानागनाथ ४५५६३ ४२५०० ९३.२८

सेनगाव ६३०६९ ५०५१८ ८०.१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT