Sangli News : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्याकडे आली असून १ लाख ४९ हजार ५०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची पेरणी १ लाख १० हजार ६०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा, गहू पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी लगबग करु लागला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे. त्यापैकी ज्वारी, गहू, मका, हरभरा या पिकांसह अन्य पिकांची पेरणी १ लाख ४९ हजार ५०३ हेक्टरवर झाली आहे. एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी १ लाख १० हजार ६०१ हेक्टर म्हणजे ८७ टक्के ज्वारीचा पेरा झाला आहे. ज्वारी पिकाची उगवण चांगली झाली असून पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. तर गहू पीक रोपावस्थेत तर मका पीक वाढीच्या अवस्थेत आहेत.
जिल्ह्यात रब्बी हंगामात तेलवर्गीय पिकांची पेरणी केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सूर्यफूल, करडई पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ४७४ हेक्टर आहे. त्यापैकी अवघे ९ हेक्टरवर म्हणजे १ टक्के पेरा झाला आहे. तर करडईचे सरासरी क्षेत्र ३६५ हेक्टर इसून १ हेक्टर म्हणजे ०.३ टक्के लागवड झाली आहे. अर्थात तेलवर्गीय पिकांची शेतकऱ्यांच्यात जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग मागे पडत असल्याचे दिसते आहे.
वाळवा, शिराळा, मिरज, पलूस या तालुक्यात उस गाळपाला गेल्यानंतर गहू व हरभरा पीक घेतले जाते. सध्या गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे गहू व हरभरा पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. सद्यःस्थितीला गव्हाची १० हजार तर हरभऱ्याची १२ हजार ५३२ हेक्टरवर पेरा झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत गहू आणि हरभरा पिकांच्या पेरणीला गती येण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय रब्बी हंगामातील पेरणी दृष्टिक्षेप
तालुका क्षेत्र (हेक्टर)
मिरज १७,६६५
जत ७३,६१६
खानापूर २,६०६
वाळवा ४,०९९
तासगाव ८,०५२
शिराळा ३,३५२
आटपाडी १४,७८४
कवठेमहांकाळ १७,६६९
पलूस ९७३
कडेगाव ६,६८५
एकूण १,४९,५०३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.