Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : खानदेशात रब्बी पिकांची पेरणी ११० टक्क्यांवर शक्य

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात जोरदार पावसाने अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. खरिपात हानी झाली आहे. परंतु रब्बीबाबत अपेक्षा असून, रब्बी पिकांची पेरणी ११० टक्क्यांपेक्षा अधिक होईल, असे दिसत आहे.

हरभऱ्यासह मका लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. खानदेशात कोरडवाहू क्षेत्रातही रब्बीची पेरणी बऱ्यापैकी होईल. त्यात कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी दसऱ्यानंतर होणार आहे.

वातावरण नीरभ्र राहिल्यास काही दिवसांत सोयाबीन, उडीद, मूग पिकांखाली रिकाम्या क्षेत्रात मशागत करून त्यात पेरणीही होईल. तसेच अन्य बागायती रब्बी पिकांची पेरणीही अपेक्षेएवढी होईल. कारण जळगावात गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यात पांझरा, अनेर आदी प्रकल्पांतून रब्बीसाठी पाणी दिले जाईल.

कारण हे सर्व प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. मागील वेळेस जळगावात गिरणा प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी मिळाले नव्हते. कारण त्यात फक्त ५६ टक्के जलसाठा होता. गिरणा धरणामुळे जळगावात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव भागातील २१ हजार हेक्टरवरील रब्बीला लाभ होतो.

चार लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा अपेक्षित

जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होईल. यात एकट्या हरभऱ्याची पेरणी जळगावात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात होऊ शकते. तर खानदेशात मिळून हरभऱ्याची पेरणी सव्वादोन लाख हेक्टरवर होऊ शकते. त्यापाठोपाठ मक्याची एक लाख हेक्टरवर पेरणी शक्य आहे. तसेच ज्वारीची पेरणीही सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टरवर होईल. गव्हाची पेरणी २४ ते २५ हजार हेक्टरवर होऊ शकते.

त्यात खानदेशात केळी, पपई आदी पिकांसाठी हरभरा पिकांचे बेवड चांगले मानले जाते. यातूनही अनेकांनी जमिनीचा पोत, सुपीकता आदी बाबी लक्षात घेऊन हरभरा पेरणीचे नियोजन केले आहे. काबुली हरभऱ्याची पेरणी खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टरवर होणार आहे. यात मोठा काबुली किंवा डॉलर हरभऱ्याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्टरवर होणार असल्यचा अंदाज आहे. हरभरा पीक तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी नद्यांच्या भागात बागायती हरभरा पेरणी अधिक होईल. जळगाव जिल्ह्यात मक्याची लागवड ६० ते ७० हजार हेक्टरवर होऊ शकते.

कोरडवाहू क्षेत्रात पेरणीस अनुकूल स्थिती

यंदा पाऊसमान चांगले आहे. मागील आठवड्यातही पाऊस झाला. काळ्या कसदार जमिनीत चांगला ओलावा आहे. खानदेशात रब्बीची चार लाख हेक्टरवर पेरणी चांगला पाऊस झाल्यास होते. यंदाही ही पेरणी चार लाख हेक्टरवर होईल. कारण पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगाम बऱ्यापैकी असणार आहे.

मागील वेळेस पावसाची तूट होती. ही तूट जळगावात १० टक्के तर धुळे व नंदुरबारमध्ये प्रत्येकी २० टक्के होती. यामुळे कोरडवाहू रब्बीची पेरणी अनेक भागांत झाली नव्हती. कोरडवाहू रब्बी हंगामात हरभरा व दादर ज्वारीचे पीक अधिक असते. काळ्या कसदार जमिनी किंवा तापी, पांझरा, अनेर, गिरणा नदीच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी यंदा बऱ्यापैकी असणाार आहे.

यंदा पाऊस चांगला आहे. आम्ही रब्बीसाठी क्षेत्र नापेर ठेवले होते. त्यात आता मशागत करून दसऱ्याच्या काळातच किंवा नवरात्रोत्सवादरम्यान दादर ज्वारीची पेरणी करू. नापेर क्षेत्रात कोरडवाहू ज्वारी पीक जोमात येते.
- दिलीप खडके, शेतकरी, जळगाव बुद्रुक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या २५ टक्के अग्रिमसाठी अधिसूचना

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT