Rabbi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Season : कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी पूर्ण होत आली आहे. यंदा क्षेत्र स्थिर आहे. काळ्या कसदार जमिनीत ओलावा टिकून राहील्याने पेरणी यशस्वी होत, असल्याचे चित्र आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खानदेशात तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात दरवर्षी दसरा सणाला किंवा दिवाळीपूर्वी कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी केली जाते. उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात ही पेरणी केली जाते.

तसेच काही शेतकरी आपले क्षेत्र कोरडवाहू दादर ज्वारीसाठी नापेर ठेवतात. त्यात मशागत करून लागलीच पेरणी केली जाते. यंदा ही पेरणी मागील १० ते १५ दिवसांपासून सुरू आहे. काही शेतकऱ्यांची पेरणी यशस्वी झाली असून, बिजांकुरण जोमात झाले आहे.

कोरडवाहू दादर ज्वारीसाठी जळगाव जिल्ह्यात जळगावमधील आसोदा, भादली, कानळदा, फुपनगरी, कडगाव, शेळगाव, ममुराबाद, तुरखेडा, आवार, चोपड्यातील कुरवेल, सनपुले, घाडवेल, चहार्डी, अकुलखेडा, अमळनेरातील अमळगाव व परिसर, धुळ्यातील शिरपूरमधील तापी काठालगतचा भाग, नंदुरबारातील शहादा तालुका प्रसिद्ध आहे.

अनेक शेतकरी पारंपरिक किंवा घरातील बियाण्याचा पेरणीसाठी उपयोग करतात. तर काही शेतकरी विद्यापीठांकडून संशोधित व इतर संकरित वाणांचा उपयोग दादर ज्वारी पेरणीसाठी करतात. यंदा क्षेत्र कमी होईल, असे संकेत होते. परंतु काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याऐवजी चारा व धान्यासाठी दादर ज्वारीस पसंती दिली.

यामुळे कोरडवाहू दादर ज्वारीचे क्षेत्र स्थिर आहे. ही पेरणी खानदेशात मिळून सुमारे १५ हजार हेक्टरवर आहे. दरवर्षी १५ ते १६ हजार हेक्टरवर ही पेरणी केली जाते. कुठलीही फवारणी, रासायनिक खते या पिकास लागत नाहीत. तसेच अमेरिकन लष्करी अळी व इतर रोगराई पिकात येत नाही.

मागील दोन हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीचे दर टिकून राहीले आहेत. चाऱ्यासही प्रतिशेकडा पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन अनेक शेतकऱ्यांनी साध्य केले आहे. कमी खर्च व चांगले उत्पादन, नफा यासाठी शेतकऱ्यांनी दादर ज्वारी पेरणीस पसंती दिली आहे.

यंदा पूर्वमशागत व इतर कार्यवाहीसाठी ट्रॅक्टर वेळेत उपलब्ध होत नव्हते. यामुळे काही शेतकऱ्यांच्या ज्वारीची पेरणी मागील दोन ते तीन दिवसातही झाली आहे. तर काही शेतकरी या आठवड्यातही पेरणी करतील. पेरणीस उशीर होईल, असे लक्षात घेता शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे पेरणी उरकून घेतली आहे.

संकरित, बागायती ज्वारीची पेरणी नोव्हेंबरमध्ये

खानदेशात संकरित व इतर वाणांच्या बागायती ज्वारीची पेरणीदेखील केली जाईल. ही पेरणी कापूस, सोयाबीन व इतर पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात केली जाईल. या ज्वारीस दोन किंवा तीन वेळेस सिंचन करावे लागते.

अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकात वेचणी सुरू आहे. ही वेचणी पुढील महिन्याच्या मध्यात पूर्ण होईल. यानंतर कापूस पीक काढून त्यात ज्वारीची पेरणी केली जाईल, असे चित्र खानदेशात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hariyana Jammu Kashmir Election Result : हरिणायात तिसऱ्यांदा भाजप, जम्मू काश्मीरच्या जनतेची काँग्रेस आघाडीला साथ

Rabi Season 2024 : सांगली जिल्ह्यात रब्बी पेरण्या सुरू

Pink E -Rikshaw : पिंक ई रिक्षा योजनेचा सोलापूरच्या ६०० महिलांना मिळणार लाभ

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठाप्रकरणी फौजदारी कारवाई करा

Tehsil Office : करमाळा तहसीलप्रश्नी बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने

SCROLL FOR NEXT