Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : खानदेशात पेरण्यांना आली गती

Rabi Sowing : खानदेशात पाऊसमान चांगले होते. यामुळे काळ्या कसदार जमिनीत पेरणीची स्थिती नव्हती. परंतु आता वाफसा होत असून, पेरणीला गती येत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पाऊसमान चांगले होते. यामुळे काळ्या कसदार जमिनीत पेरणीची स्थिती नव्हती. परंतु आता वाफसा होत असून, पेरणीला गती येत आहे. पेरणीची टक्केवारी २० पेक्षा अधिक झाली आहे.

हलक्या, मुरमाड जमिनीच्या भागात पेरण्या झाल्या आहेत. काळ्या कसदार जमिनीच्या भागात पावसाने नुकसान झाले. त्यात मागील महिन्यातही पेरणीसाठी वाफसा नव्हता. यामुळे पेरणी रखडली होती. परंतु दिवाळीनंतर पेरणी सुरू झाली आहे. नीरभ्र वातावरण असल्याने शेतीकामांनी जोर धरला आहे.

सततचा पाऊस ऑक्टोबरमध्येही होता. काही भागांत दसरा सणाच्या काळात अतिजोरदार पाऊस झाला होता. अन्य भागात तुरळक पाऊस झाला. यामुळे पिके हातची गेली. तसेच रब्बी पेरणीलाही खिळ बसली. कारण शेतांत तण वाढले. वाफसा नसल्याने तण काढता येत नव्हते. परंतु या आठवड्यात शेतीकामांनी वेग घेतला आहे.

केळी, तूर आदी पिकांत कामे सुरू आहेत. तसेच केळी लागवडीसह मका, भाजीपाला लागवडही सुरू आहे. लहान केळी बागांसह उसातही तण वाढले होते. हे तण काढण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. कारण तणामुळे मुख्य पिकाच्या मुळा व तणाच्या मुळांची स्पर्धा होते व यात मुख्य पिकाच्या वाढीला फटका बसतो.

मुख्य पिकास खतेही तण वाढल्याने दिली जात नव्हती. परंतु आता आंतरमशागतीला वेग आला आहे. तण गतीने काढले जात असून, लागलीच बैलांकरवी आंतरमशागत केली जात आहे. यानंतर खते दिली जात आहेत.

मागील दोन दिवसांत मशागतीला वेग आला आहे. मजुरांकरवी कापूस वेचणीसह अन्य कामे करून घेतली जात आहे. मागील दोन-तीन दिवसांत पेरणीची टक्केवारी आणखी वाढली आहे. खानदेशात रब्बीची पेरणी चार लाख हेक्टरवर होईल. जळगावातील पेरणी अडीच लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. त्यात हरभऱ्याची पेरणी सव्वा लाख हेक्टरवर होईल.

मजूरटंचाई कायम

खानदेशात मजूरटंचाई कायम आहे. आता एकाच वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कामे सुरू झाली आहेत. यामुळे मजुरांची गरजही अधिक आहे. नीरभ्र वातावरण असल्याने शेतकरी कामे उकरून घेत असून, निवडणुकीची धूम सुरू असल्याने मजूरटंचाई तयार झाली आहे. यामुळे अन्य गावांतून मजूर आणावे लागत आहेत. मजुरी दर १८० ते २०० रुपये प्रतिरोज, असा दिला जात आहे. काहींनी मजूरटंचाईमुळे घरातील मंडळीच्या मदतीने कामे करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance : फळपीक विमा प्रश्न सुटता सुटेना

Cotton Procurement : बार्शीटाकळीमध्ये कापूस खरेदी बंदचा निर्णय मागे

Agriculture Irrigation : घुंगशी प्रकल्पावरून सिंचनासाठी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा

Solapur APMC : सोलापूर बाजार समितीतील १० अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

Cotton Crop : कापूस प्रक्षेत्र दिवसानिमित्त शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत प्रत्यक्षिके

SCROLL FOR NEXT