Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing: राज्यात आतापर्यंत सव्वा लाख हेक्टरवर पेरा

Agriculture Advice: राज्यात १५ जून नंतरच मॉन्सूनचा पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. जून महिन्यात ६५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यात १५ जून नंतरच मॉन्सूनचा पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. जून महिन्यात ६५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, केवळ १८ मिलिमीटर पाऊस झाल्याने केवळ एक टक्का पेरणी झाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी (ता. १०) कृषी विभागाने दिली आहे.

राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातल्याने खरिपाच्या मशागतीला पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यानेही पेरण्या कमी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सध्या सव्वा लाख हेक्टरवर पेरणी झाली असून जळगाव, धुळे, नंदूरबार आदी जिल्ह्यांत कापूस आणि सोयाबीनची पेरणी सुरू झाली आहे. उर्वरित ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. तसेच यंदा सोयाबीनचे दर कमी राहण्याच्या शक्यतेने शेतकरी मका पिकाकडे वळतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.

कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा या बाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. राज्यातील सर्व भागात पंधरा जूनपर्यंत मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. १५ जून नंतरच पावसाची मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सतरा जिल्ह्यांत २५ टक्के पेक्षा कमी, १२ जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के, चार जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के तर एका जिल्ह्यात १०० टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

पाऊस तीन ते चार दिवसांत सक्रिय

मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे.

त्यानुसार मध्य महाराष्ट्रात बारा जून रोजी मराठवाड्यातील काही भागांत बारा ते चौदा जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे बारा आणि पंधरा जून दरम्यान मुसळधार तर १३, १४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT