Groundnut Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Crop : ४५०० हजार हेक्टरवर भुईमूग पिकाची पेरणी

Groundnut Sowing Update : पुणे विभागात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी १२ हजार ८४७ हेक्टरपैकी ४ हजार ४५६ हेक्टरवर म्हणजेच ३५ टक्के पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Pune News : उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाळी हंगामातील पेरण्या थंडावल्याचे चित्र आहे. पुणे विभागात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी १२ हजार ८४७ हेक्टरपैकी ४ हजार ४५६ हेक्टरवर म्हणजेच ३५ टक्के पेरणी झाली आहे. सध्या भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. उशिराने पेरलेल्या गहू पिकांची काढणी चालू आहे. तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. भुईमूग हे तेलपिकांमध्ये गणले जात आहे.

त्यामुळे दरवर्षी अनेक शेतकरी भुईमुगाची पेरणी करतात. साधारणपणे तीन ते चार महिन्यात भुईमूग काढणीला येतो. सध्या नगर जिल्ह्यात सरासरीच्या सहा हजार ३१९ हेक्टरपैकी १ हजार ८७८ हेक्टर म्हणजेच ३० टक्के पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात ३ हजार ४०२ हेक्टरपैकी १ हजार ५७४ हेक्टर म्हणजेच ४६ टक्के पेरणी झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात भुईमुगाची ३ हजार १२६ हेक्टरपैकी १ हजार ४ हेक्टर म्हणजेच ३२ पेरणी झाली आहे.नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक ९९१ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे.

त्यानंतर पाथर्डी, नेवासा, कर्जत, कोपरगाव तालुक्यांत पेरणी झाली आहे.तर नगर, पारनेर, जामखेड, राहुरी, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता या तालुके भुईमूग पिकांपासून दूर आहेत. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. अनेक शेतकरी लवकर काढणीला येणाऱ्या वाणाला पसंती देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT