Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची ७ हजार ७२६ हेक्टरवर पेरणी

Groundnut Update : यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. १)पर्यंत उन्हाळी भुईमुगाची परभणी जिल्ह्यात ७८५ हेक्टर (११.५५ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ९४१ हेक्टर (१०७.३८ टक्के) पेरणी झाली आहे.
Groundnut Sowing
Groundnut SowingAgrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. १)पर्यंत उन्हाळी भुईमुगाची परभणी जिल्ह्यात ७८५ हेक्टर (११.५५ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ९४१ हेक्टर (१०७.३८ टक्के) पेरणी झाली आहे. एकूण उन्हाळी पिकांची परभणी जिल्ह्यात १ हजार २०२ हेक्टर (१०.९७ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ८ हजार ८५ हेक्टर (३०.६८ टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून ९ हजार २८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी १० हजार ९५८ हेक्टर आहे.

परंतु शुक्रवार (ता.१) पर्यंत १ हजार २०२ हेक्टरवर (१०.९७ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ९६१ हेक्टरवर (१०.१३ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ७८५ हेक्टर (११.५५ टक्के), सोयाबीनची २ हजार ६६२ पैकी १७० हेक्टर (६.३८ टक्के),तिळाची ११.२४ पैकी २ हेक्टर (१७.७९ टक्के), तर सूर्यफुलाची ४ हेक्टर पेरणी झाली आहे. कडधान्यांची ४९.०७ पैकी ४ हेक्टर (८.१५ टक्के) पेरणी झाली आहे.

Groundnut Sowing
Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग पेरणी पूर्णत्वाकडे

त्यात मुगाची ३२.४ पैकी ४ हेक्टर (१२.३५ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी २३७ हेक्टर (१६.६० टक्के) पेरणी झाली. त्यात मक्याची १ हजार ३७७ पैकी १४० हेक्टर, बाजरीची ५०.२७ पैकी ९७ हेक्टर (१९२. ९६ टक्के) पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडे आजवर जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या ७ तालुक्यांतील पेरणीची नोंद झाली, परंतु परभणी, सोनपेठ तालुक्यांतील पेरणीची नोंद झालेली नाही.

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. १)पर्यंत ८ हजार ८५ हेक्टरवर (३०.६ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी ७ हजार ५५६ हेक्टरवर (५०.८६ पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ४६३.९९ पैकी ६ हजार ९४१ हेक्टर (१०७.३८ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ६१५ हेक्टर (७.३३ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी २६७ हेक्टर (४.८३ टक्के) पेरणी झाली.

Groundnut Sowing
Groundnut Sowing : भुईमुगाची पेरणी सातशे हेक्टरवर

त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी १२४ हेक्टर (६.४८ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १४३ हेक्टर (४.०३ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी २६२ हेक्टरवर (४.३९ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १ हजार ९५ पैकी २६२ हेक्टर (२३.९३ टक्के) पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडे आजवर औंढा नागनाथ व सेनगाव या दोन तालुक्यांतील पेरणीची नोंद झाली परंतु हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यातील पेरणी क्षेत्राची नोंद झालेली नाही.

परभणी हिंगोली जिल्हा उन्हाळी हंगाम २०२४ पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार (ता. १) पर्यंत

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ३१०० ०० ००

जिंतूर ३९७५ २३० ५.७९

सेलू २८० ७१ २५.३०

मानवत ५५८ ४११ ७३.५६

पाथरी ४२२ २६२ ६१.९९

सोनपेठ ४५९ ०० ००

गंगाखेड ५८५ ८६ १४.६८

पालम ३१२ २५ ८.०

पूर्णा १२६३ ११७ ९.२६

हिंगोली २७८१...०० ००

कळमनुरी १९८५ ०० ००

वसमत १३२६४ ०० ००

औढानागनाथ २१२० ६३७० ३००.४७

सेनगाव ६१९६ १७१५ २७.६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com