Groundnut Sowing : पुणे विभागात साडेचार हजार हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी

Groundnut Production : पुणे विभागातील स्थिती; सरासरी साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र
Groundnut Sowing
Groundnut SowingAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाळी हंगामातील पेरण्या थंडावल्याचे चित्र आहे. पुणे विभागात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी १२ हजार ८४७ हेक्टरपैकी ४ हजार ४५६ हेक्टरवर म्हणजेच ३५ टक्के पेरणी झाली आहे. सध्या भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. उशिराने पेरलेल्या गहू पिकांची काढणी चालू आहे. तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. भुईमूग हे तेलपिकांमध्ये गणले जात आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक शेतकरी भुईमुगाची पेरणी करतात.

साधारणपणे तीन ते चार महिन्यात भुईमूग काढणीला येतो. त्यामुळे अनेक शेतकरी दहा गुंठे ते पाच ते दहा एकरांपर्यंत पेरणी करतात. त्यासाठी कृषी विद्यापीठाने अनेक जाती प्रसिद्ध केल्या असून त्या जातीचा पेरणी शेतकरी करतात. तर काही शेतकरी खासगी जातीच्या भुईमुगाची पेरणी करतात. सध्या नगर जिल्ह्यात सरासरीच्या सहा हजार ३१९ हेक्टरपैकी १ हजार ८७८ हेक्टर म्हणजेच ३० टक्के पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यात ३ हजार ४०२ हेक्टरपैकी १ हजार ५७४ हेक्टर म्हणजेच ४६ टक्के पेरणी झाली आहे.

Groundnut Sowing
Groundnut Sowing : भुईमुगाची पेरणी सातशे हेक्टरवर

तर सोलापूर जिल्ह्यात भुईमुगाची ३ हजार १२६ हेक्टरपैकी १ हजार ४ हेक्टर म्हणजेच ३२ पेरणी झाली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक ९९१ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे. त्यानंतर पाथर्डी, नेवासा, कर्जत, कोपरगाव तालुक्यांत पेरणी झाली आहे.तर नगर, पारनेर, जामखेड, राहुरी, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता या तालुके भुईमूग पिकांपासून दूर आहेत. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

सुमारे ६०४ हेक्टरवर भुईमूग पेरणी झाली आहे. तर शिरूर, आंबेगाव, भोर, बारामती, पुरंदर, मुळशी या तालुक्यातही काही प्रमाणात पेरणी झाली आहे. उर्वरित तालुक्यात अत्यंत अल्प पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या तालुक्यात बऱ्यापैकी भुईमूग पेरणी झाली असून उर्वरित तालुके पेरणीपासून दूर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com