Chana Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : हरभऱ्याची १ लाख ९ हजारांवर हेक्टरवर पेरणी

Rabi Sowing : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. ८)पर्यंत १ लाख ६१ हजार ८२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. ८)पर्यंत १ लाख ६१ हजार ८२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील ९८ हजार ६६५ हेक्टर (३६.४४ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यातील ६३ हजार १६४ हेक्टर (३५.७१ टक्के) पेरणी क्षेत्राचा समावेश आहे.

या दोन जिल्ह्यांत मिळून आजवर १ लाख ९ हजार २३२ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. ८)पर्यंत २ लाख ७० हजार ७९४ पैकी ९८ हजार ६६५ हेक्टरवर (३६.४४टक्के) पेरणी झाली आहे.

त्यात हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ५५ हजार ९६३ हेक्टर (४९.८९ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ३९ हजार ३१० हेक्टर (३४.७६ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी २ हजार ५२४ हेक्टर (६.४२ टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी १६२ हेक्टर (७.७६ टक्के) पेरणी झाली.

करडईची ३ हजार ३७१ पैकी ६०३ हेक्टर (१७.८८ टक्के), जवसाची ११९ पैकी २४ हेक्टर (२०.१७ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी ९ हेक्टर (२६.७५ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी ६३ हजार १६४ हेक्टरवर (३५.७१ टक्के) पेरणी झाली आहे.

त्यात हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी ५३ हजार २६९ हेक्टर (४४.३४ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी ५ हजार ४४२ हेक्टर (४६.५२ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ४ हजार २७० हेक्टर (१०.०५ टक्के), मक्याची ९७१ पैकी १०३ हेक्टर (१०.६१ टक्के) पेरणी झाली. करडईची २०५ पैकी ८० हेक्टर (३८.९० टक्के) पेरणी झाली. वसमत तालुक्यातील रब्बी पेरणीची आकडेवारी अप्राप्त असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT