Grape Season Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Season : द्राक्षाचा हंगाम गोड होण्यापूर्वीच आंबट

Grape Rate : हंगामाच्या प्रारंभीच द्राक्षाचे दर दबावात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. यंदाचा द्राक्षाचा हंगाम गोड होण्यापूर्वी आंबट झाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : नैसर्गिक आपत्ती, पाणीटंचाई आणि मॉन्सूनोत्तर पावसाच्या संकटातून यंदाचा द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. सध्या द्राक्षाला प्रति किलोस ३० रुपयांपासून ४५ रुपये असा दर मिळत आहे.

हंगामाच्या प्रारंभीच द्राक्षाचे दर दबावात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. यंदाचा द्राक्षाचा हंगाम गोड होण्यापूर्वी आंबट झाला आहे. त्यामुळे शेतकरी सर्वच बाजूंनी कचाट्यात सापडला आहे.

सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामापासूनच पाणी कमतरतेचे सावट होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे नियोजन केले. परंतु फळ छाटणी विभागून झाली. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा साधल्या. ऑगस्ट महिन्यात मिरज तालुक्याचा पूर्व भाग, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील अनेक भागात आगाप फळ छाटणी केली.

सप्टेंबर महिन्यात फळ छाटणीला गती आली. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात उर्वरित भागातील फळ छाटणी पूर्ण झाली. फळ छाटणीनंतर पाऊस नाही. पाण्याची कमतरता यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत द्राक्ष बागा फुलविल्या.

मात्र, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले. त्यातच धुके, ढगाळ वातावरणाचा फटका तयार द्राक्ष बागांना बसला. मण्यांवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.

जिल्ह्यात मिरज पूर्व, तासगाव, कवठेमहांकाळ या भागातील आगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे. सध्या पाच टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची काढणी सुरू आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी देशभरातील बाजारपेठेतील व्यापारी जिल्ह्यात दाखल होतात.

परंतु, हंगाम सुरू होऊन आठ दिवस झाले तरी, पुरेसे व्यापारी दाखल झालेले नाहीत. थंडीमुळे व्यापारी आले नसल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. द्राक्षाचे उत्पादन कमी असूनही बाजारपेठेत द्राक्षांना उठाव होत नाही. त्याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर झाला आहे.

दरवाढीकडे उत्पादकांचे लक्ष

वास्तविक पाहता, गतवर्षी डिसेंबरमध्ये द्राक्षाला प्रतिकिलोस ६५ रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत दर होते. मात्र, यंदा हंगामाच्या प्रारंभीच द्राक्षाला प्रतिकिलोस ३० ते ४५ रुपये दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच दर दबावात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे. त्यामुळे येत्या काळात द्राक्षाचे दर वाढणार का याकडे द्राक्ष उत्पादकांचे लक्ष आहे.

यंदाच्या हंगामावर सर्वच बाजूंनी संकट आले आहे. बाजारपेठेत द्राक्षाची आवक कमी असली तरी, अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे द्राक्षावर केलेला खर्चही मिळणे कठीण बनले आहे.
चंद्रकांत लांडगे, द्राक्ष उत्पादक शेतकरी मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली.

थोडक्यात महत्त्वाचे...

- द्राक्ष उत्पादक आस्मानीनंतर आता आर्थिक अडचणींच्या कचाट्यात
- बुरशीजन्य करपा रोगांच्या प्रादुर्भावाचेही संकट
- देशभरातील व्यापाऱ्यांची संख्या कमी
- हंगाम सुरू होऊन आठ दिवस झाले तरी, पुरेसे व्यापारी नाहीत दाखल
- बाजारपेठेत आवक कमी असूनही उठाव नाही
- दर नसल्याने कर्ज कशी फेडायची ?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: राज्यात ४ दिवस पावसाची उघडीप राहणार; शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Weekly Weather: बहुतांश जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता

Samruddha Panchayat Raj : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये अकोल्याने लौकिक वाढवावा

Dairy Farming: दुधातील फॅट, एसएनएफवर परिणाम करणारे घटक

Crop Damage : शेतकऱ्यांचा दलदलीशी होतोय सामना

SCROLL FOR NEXT