Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain: माॅन्सून ४ जून रोजी राज्यात येणार ? राज्यात उद्यापासून पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज

Monsoon Rain Update : माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये आणखी काही भागात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभगााने दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : केरळमध्ये दोन दिवस आधी दाखल झालेल्या माॅन्सून आज त्याच भागात मुक्काम केला. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये आणखी काही भागात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभगाने दिला. तर राज्यात माॅन्सून ४ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो, असा अंदाज काही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. 

मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा उद्यापासून अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे मॉन्सूनची वेगाने वाटचाल होण्याचे संकेत हवामान प्रारूपांमधून मिळत आहेत. यातच गोव्यासह राज्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने मॉन्सूनचे आगमन देखील लवकर होण्याची अंदाज आहे. गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी मॉन्सून दाखल होण्याचा शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

हवामान विभागाने उद्या विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा तर मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला. तर उद्यापासून विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच संपूर्ण केरळ आणि लक्षद्वीप, कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होईल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT