Parbhani News : जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषिपंप योजअंतर्गंत शेतकऱ्यांच्या सिंचन स्त्रोतांच्या ठिकाणी सौर कृषीपंप कार्यान्वित करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. बुधवार (ता. १६) पर्यंत जिल्ह्यातील ८८ हजार ३१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. एकूण २४ हजार ४९२ शेतकऱ्यांनी रकमेचा भरणा केला त्यापैकी १३ हजार ४२९ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत.
सौर कृषिपंप स्थापित करण्यासाठी १० हजार १४१ शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली असून त्यापैकी केवळ ६४१ शेतकऱ्यांचे सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. महावितरण कडून केलेले जाणारे भारनियमन तसेच अन्य कारणांमुळे कृषीपंपाना सुरळीत वीज पुरवठा होत नाही.त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. या समस्येवरील उपायाअंतर्गंत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे कृषीपंप उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान सौर कृषिपंप (कुसुम) योजना तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरु करण्यात आल्या.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतअंतर्गंत इतर शेतकऱ्यांना १० टक्के तर अनुसूचित जाती-जमाती वर्गवारीतील शेतकऱ्यांना ५ टक्के रक्कम भरणा केल्यानंतर सौर कृषिपंप दिले जातात. याअंतर्गंत बुधवार (ता. १६) पर्यंत जिल्ह्यात ८८ हजार ३१ शेतकऱ्यांनी अर्ज केले. रकमेचा भरणा केलेल्या २४ हजार ४९२ पैकी १३ हजार ४२९ अर्ज मंजूर करण्यात आले. अपूर्ण असलेले ३८४ अर्ज नाकारले आहेत. त्रुटीमुळे १ हजार ३१ अर्ज परत केले आहेत.
छाननीकरिता प्रलंबित अर्जांची संख्या ९ हजार ६३८ आहे. कंपनीची निवड केलेल्या १० हजार १४१ पैकी ६४१ शेतकऱ्यांच्या जलस्त्रोतांवर सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. ऑनलाईन पध्दतीने रकमेचा भरणा केल्यानंतर कंपनीची निवड तसेच सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना कृषिपंप कार्यान्वित होण्यासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे.
कुसुम योजनेत १३ हजारवर सौरकृषिपंप कार्यान्वित.....
परभणी जिल्ह्यात पंतप्रधान सौर कृषिपंप (कुसूम) योजनेत २१ हजार ११६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १५ हजार ८४५ अर्ज मंजूर करण्यात आले. अपूर्ण असल्यामुळे १ हजार २०६ अर्ज नाकारले. अंदाज पत्रकाची रक्कम भरणा केलेल्या १४ हजार ३२३ पैकी १३ हजार ४१२ शेतकऱ्यांचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
परभणी जिल्हा मागेल त्याला सौर कृषीपंप तालुकानिहाय स्थिती
तालुका एकुण अर्ज रक्कम भरणा मंजूर अर्ज कंपनी निवड कार्यान्वित सौरपंप
परभणी १९५६५ ५५२९ १६६७ १३८८ १६५
जिंतूर १०७८० २५२१ ९५२ ४६९ २
सेलू ११७७९ ३४७२ ३०७८ २५८२ १०१
मानवत ७५७४ २१५१ १७८० ११४२ ३९
पाथरी १०२१५ ३३७१ ३०२२ २४५५ ११०
सोनपेठ ३७४४ ९८४ ८४७ ५७१ २३
गंगाखेड ५०४७ १५१५ ६१२ ३९८ ७३
पालम ५८९४ १५५७ १०२६ ७४३ ८४
पूर्णा १३४३३ ३३९२ ४४५ ३९३ ४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.