PM Surya Ghar Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Pm Surya Ghar Yojana : ‘सूर्यघर’चा जिल्ह्यातील ८५३३ ग्राहकांना लाभ

Rooftop Solar : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील १५ हजार ४६० घरगुती ग्राहक सौरप्रकाशात आले आहेत.

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील १५ हजार ४६० घरगुती ग्राहक सौरप्रकाशात आले आहेत. या ग्राहकांनी एकूण ५१.९५ मेगावॅट क्षमतेची सौरछत (सोलर रूफ टॉप) यंत्रणा बसविली आहे. त्यात सोलापूर मंडळातील ८ हजार ५३३ (२९.३१ मेगावॅट) ग्राहकांचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. घराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराच्या विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे.

वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते, अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत सौर प्रकल्पासाठी २ किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रती किलोवॅटला ३० हजार रुपये तर तिसऱ्या किलोवॅटला १८ हजार रुपये अनुदान मिळेल.

अर्थात १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. १ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाद्वारे वार्षिक सरासरीने मासिक सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते.

मासिक १५० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबाला २ किलोवॅट तर मासिक १५० ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी ३ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा पुरेशी ठरते.

१ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेसाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा आवश्यक आहे. त्याद्वारे वार्षिक सरासरीनुसार प्रत्येक महिन्याला १२० युनिट वीज निर्मिती होते. मासिक वीज बिलात बचत होऊन गुंतविलेल्या रक्कमेची ४ ते ५ वर्षात परतफेड मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT