Solar Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : अकोला जिल्ह्यात चार सौर प्रकल्प, दोन उपकेंद्रांचे भूमिपूजन, लोकार्पण

Day Time Electricity : बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सौर प्रकल्पांतून मिळणाऱ्या १२ मेगावॉट हरित ऊर्जेमुळे रेडवा, धाबा, बार्शीटाकळी, पातूर नंदापूर आदी गावांतील २ हजार ५९५ शेतकऱ्यांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीज मिळणार आहे.

Team Agrowon

Akola News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत अकोला जिल्ह्यातील चार महत्त्वपूर्ण सौर प्रकल्प आणि दोन नवीन उपकेंद्रांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील रेडवा (२ मेगावॅट) आणि भेंडीमहाल (१० मेगावॉट) या पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण, तसेच तेल्हारा तालुक्यातील मनात्री व अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील प्रत्येकी १० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.

यासोबतच मूर्तिजापूर तालुक्यातील ३३ केव्ही हिवरा कोरडे आणि ३३ केव्ही पारद या दोन नवीन उपकेंद्रांचाही प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी आणि महावितरणचे पदाधिकारी उपस्थित होते.

१४ हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज

बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सौर प्रकल्पांतून मिळणाऱ्या १२ मेगावॉट हरित ऊर्जेमुळे रेडवा, धाबा, बार्शीटाकळी, पातूर नंदापूर आदी गावांतील २ हजार ५९५ शेतकऱ्यांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीज मिळणार आहे.

तर मनात्री व अकोलखेड प्रकल्पांचा १५०० शेतकऱ्यांना लाभ मिळेल. या नवीन प्रकल्पांतून १५०० शेतकरी लाभार्थी असतील. जिल्ह्यात एकूण १० सौर प्रकल्प कार्यरत असून त्यातून ५० मेगावॉट वीजनिर्मिती होते. यामुळे १४ हजारांहून अधिक कृषिपंप दिवसा सुरू राहू शकत आहेत.

हिवरा कोरडे, पारद उपकेंद्रांचे भूमिपूजन

प्रत्येकी ५ एमव्हीए क्षमतेची व ६.४८ कोटींच्या खर्चाची ही उपकेंद्रे एआयआयबी योजनेअंतर्गत उभारली जात असून दर्जेदार, सुरळीत व स्थिर वीजपुरवठा सुनिश्चित करतील. माना, शेलूबाजार, पारद, मंगशी, येंडली आदी गावांना याचा थेट लाभ मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : कर्नाटकचा ‘ऊस’ चोरण्याचा डाव

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका

Grass Seed Sale : गवत बिया विक्रीतून दहा लाखांचा नफा

Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणास विरोध

Rain Crop Loss : अतिवृष्टीमुळे कापसाला फटका बसण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT