Kolhapur Solar Energy agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Solar Energy : गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावांत सौर प्रकल्पांची उभारणी होणार

Solar Energy : सौर ऊर्जेच्या वापराकडे कल वाढू लागला आहे. त्याला सहाय्यभूत ठरतील अशीच धोरणे शासनस्तरावरुन आखली जात आहेत.

sandeep Shirguppe

Jal Jeevan Mission Kolhapur : सौर ऊर्जेच्या वापराकडे कल वाढू लागला आहे. त्याला सहाय्यभूत ठरतील अशीच धोरणे शासनस्तरावरुन आखली जात आहेत. जल जीवन मिशनच्या पाणी योजनांसाठीही सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावांत सौर प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे.

त्यातून दोन हजार १५ किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून शिल्लक वीज महावितरणलाही देता येणार आहे. 'हर घर जल'चा नारा देत केंद्र शासनाने जल जीवन मिशन हाती घेतले.

ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाव्दारे पाणी पोचवतानाच माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावांत जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. सध्या त्यांची कामे सुरु आहेत. यापूर्वी गावात राबविलेल्या पाणी योजनांची भरमसाठ वीज बिले येत आहेत. त्याची रक्कम भरताना ग्रामपंचायतींना नाकीनऊ येत आहे.

दैनंदिन कारभार चालवितानाही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. थकबाकीमुळे महावितरणकडून अनेकदा वीज पुरवठा खंडित करण्याची नामुष्कीही येत आहे. वीज बिलाच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी जल जीवन मिशनमध्ये सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा पर्याय देण्यात आला आहे.

पाणी योजनांची जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रत्येक गावातील योजनेच्या क्षमतेनुसार हे सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावातील या प्रकल्पांतून दोन हजार १५ किलो वॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे. त्याचा वापर पाणी योजनांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे वीज बिलाचा कोणताही बोजा ग्रामपंचायतींवर पडणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT