Solar Agriculture Scheme agrowon
ॲग्रो विशेष

Solar Agriculture Scheme : सौर कृषी पंप योजनेपासून अल्पभुधारक शेतकरी वंचित; शेतजमीन अट ठरतेय जाचक

Solar Agricultural Maharashtra : शासनाने सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याचे धोरण अवलंबले, कृषी पंपांना विजेचा अधिक वापर होतो. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना आणली.

sandeep Shirguppe

Solar Agricultural Pump Scheme : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणली आहे. शासनाकडून कृषी पंपासाठी सौर संच बसवण्यासाठी सक्ती केली जात आहे. मात्र, त्यासाठी पाच एकरपेक्षा अधिक जमिनीची अट आहे. परिणामी, छोट्या शेतकऱ्यांची यामध्ये मोठी अडचण होत आहे. सौर कृषी पंप योजनेतील काही अटींमुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहे.

पारंपरिक पद्धतीने वीज निर्मितीचा खर्च मोठा आहे. शिवाय पर्यावरणाची न भरून निघणारी हानी होत आहे. त्यामुळे सौर ऊर्जेकडे पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. शासनाने सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याचे धोरण अवलंबले, कृषी पंपांना विजेचा अधिक वापर होतो. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना आणली. या योजनेच्या लाभासाठी तीन अश्वशक्तीच्या सौर कृषीपंपासाठी पाच एकरपर्यंत शेतजमिनीची तर पाच किंवा साडेसात अश्वशक्तीच्या सौर कृषी पंपासाठी पाच एकरपेक्षा अधिक शेतजमिनीची अट आहे.

मागील काही वर्षांत जमीनीतील पाणी पातळी कमी होत असल्याचे तज्ञांकडून अहवाल सादर केले आहेत. शेतकऱ्यांनी विंधन विहीर काढल्यास अपवाद वगळता ३०० ते ४०० फुटांपेक्षा खाली पाणी लागत आहे. या विंधन विहिरीतून पूर्ण क्षमतेने पाणी उचलायचे झाल्यास ३ अश्वशक्तीचा पंप ताकद कमी पडत आहे.

यासाठी ५ किंवा ७.५ अश्वशक्तीच्या पंपाची गरज लागते. पण, योजनेच्या अटीनुसार त्यासाठी ५ एकरपेक्षा अधिक शेतजमिनी आवश्यक आहे. मग, अल्पभुधारक शेतकऱ्यांनी ५ एकरपेक्षा अधिक शेतजमीन आणायची कोठून की त्यांनी विंधन विहीरच काढायची नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांची अवस्था विचित्र...

कृषी पंपासाठी सौर संच बसवणे सक्तीचे केल्यामुळे वीज वितरण कंपनीने आपल्या वीज वाहिनीवरून पूर्वीप्रमाणे कनेक्शन देणे बंद केले आहे. त्यामुळे अल्पभुधारक शेतकऱ्यांची अवस्था गोंधळाची आहे. त्यांना ना वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन मिळत आहे, ना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे अल्पभुधारक शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या योजनेतील शेतजमिनीची अट शिथिल करण्याची मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT