Solapur ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ZP : ‘झेडपी’च्या ४४ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ

ZP Employee Salary Hike : जिल्हा परिषदेच्या ४४ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्यात आली आहे. गेल्या १७ ते १९ वर्षांपासून प्रलंबित याप्रश्नी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा परिषदेच्या ४४ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्यात आली आहे. गेल्या १७ ते १९ वर्षांपासून प्रलंबित याप्रश्नी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या बाबत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या बाबतचा आदेश काढला आहे.

गेल्या १७ ते १९ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आगाऊ वेतनवाढीचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी आदेश काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे.

सहायक प्रशासन अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, वाहनचालक व परिचर असे ४४ कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबर २००६, २००७ व २००८ पासून आगाऊ वेतनवाढ मिळाली नव्हती.

या विरोधात कर्मचारी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर चार जुलै २०२२ रोजी उच्च न्यायालयाने आगाऊ वेतनवाढ देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते.

वेतनवाढ न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी अवमान याचिका दाखल केली होती. ग्रामविकास विभागाने आठ जुलैला न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Forecast Maharashtra : राज्यात वाढणार पावसाचा जोर

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT