Sarpanch Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Sarpanch Reservation : सोलापूर जिल्ह्यातील सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण

Gram Panchayat Election : जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २२ एप्रिल २०२५ रोजी काढलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत काढावी, असे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २२ एप्रिल २०२५ रोजी काढलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत काढावी, असे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सरपंचपदासाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही सोडत १५ जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी आदेश देत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणे चार महिन्यात घ्या, असे सांगितले. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश ग्रामविकासचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी दिले होते.

राज्यातील काही जिल्ह्यांनी २७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली आहे तर काही जिल्ह्यांनी ५२ टक्के आरक्षणाची मर्यादा पाळत ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांच्या कमी दिल्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. सोलापूर जिल्ह्यात २७ टक्क्यांची मर्यादा पाळली आहे.

तरीही आम्ही काय करावे ? असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविले होते. जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिल २०२५ रोजी ओबीसींना २७ टक्के आरक्षण देत सोडत काढण्यात आली होती. त्या नंतर ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण मान्य केले आहे.

त्यामुळे ज्या जिल्ह्यांनी ओबीसींना २७ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण दिले आहे, त्या जिल्ह्यांना नव्याने आरक्षण सोडत राबवावी लागणार आहे. ज्या जिल्ह्यांनी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची मर्यादा पाळली. त्यांनाही आता नव्याने आरक्षण सोडत राबवावी लागणार आहे.

जात प्रवर्गनिहाय आरक्षण

जिल्ह्यात एकूण १०२५ ग्रामपंचायती आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी सरपंचाच्या राखीव १५५ (महिलांसाठी ७८) जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी सरपंचाच्या राखीव जागा १८ (महिलांसाठी ९) ओबीसीसाठी सरपंचाच्या राखीव जागा : २७७ (महिलांसाठी १३९) सर्वसाधारण सरपंचासाठी राखीव जागा : ५७५ (महिलांसाठी २८८) यासाठी आरक्षण निश्चित कऱण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील २१ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Mango Farmers: आंबा-काजू बागांच्या नुकसानीला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करा : शेट्टी

Farmers Issues: कापणी, मळणीचा खर्च शेतकऱ्यांना परवडेना

Power Wire Theft: वीजतारांच्या चोरीमुळे शेतकरी संकटात

LPG Shortage : "नागरिकांना घाबरू नका, असं आवाहन करणारे पंतप्रधान मोदीचं घाबरलेले आहेत"; एलपीजी गॅस टंचाईवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

SCROLL FOR NEXT