Tanker Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Tanker Water Supply : टँकरची मागणी झाल्यास पडताळणी करून तत्काळ द्यावा ः कुमार आशीर्वाद

Water Scarcity Management : टंचाई आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे विहीर व विंधन विहीर अधिग्रहण करण्यात यावे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात सद्यःस्थितीत ६ तालुक्यातील २६ गावांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्याच्या अन्य ठिकाणाहून टँकर मागणीचे प्रस्ताव आल्यास त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी व विहित नियमावलीप्रमाणे तत्काळ निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, महसूल उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, भूजल चे वरिष्ठ भू वैज्ञानिक श्री. शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, टंचाई आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे विहीर व विंधन विहीर अधिग्रहण करण्यात यावे. तसेच सद्यस्थितीमध्ये २६ गावांमध्ये सुरू असलेले ३२ टँकर तर सुरूच ठेवावेत, परंतु अन्य ठिकाणाहून नागरिकांनी टँकर मागणीचे प्रस्ताव दिले असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून त्यावर तत्काळ निर्णय घ्यावा.

सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय यंत्रणांनी एकही गाव, नागरिक यांना पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी अत्यंत सतर्कता ठेवून काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी टंचाई कृती आराखड्याप्रमाणे टंचाई निवारणार्थ घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली.

प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घ्या

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याकडून लघु व मध्यम पाणी प्रकल्पामधील पाणीसाठ्याची माहिती घ्यावी, हा पाणीसाठा किती दिवस पुरेल त्याची सूक्ष्म माहिती घेऊन त्याप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT