Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : एक लाख ‘लाडक्या बहिणीं’च्या पडताळणीला सुरुवात

Women Empowerment Scheme Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधारे पडताळणी सुरू झाली. सुरवातीला चारचाकी वाहन असलेल्यांची तपासणी झाली.

तात्या लांडगे

Solapur News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील ४२ लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख महिला आहेत. सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना याद्या पाठविल्या आहेत.

त्यात वयाची अट पूर्ण नसतानाही अर्ज केलेल्या आणि कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ९९ हजार ८०० लाडक्या बहिणींची आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधारे पडताळणी सुरू झाली. सुरवातीला चारचाकी वाहन असलेल्यांची तपासणी झाली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, याशिवाय शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी झाली. सरकारी नोकरदार महिला, बोगस पुरुष लाभार्थींचीही पडताळणी झाली.

आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून वयोगट व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींची तपासणी सुरू आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील १६ हजार ७८ महिला वयाच्या निकषात अपात्र ठरल्या आहेत.

अनेकांनी वय ६५ पेक्षा जास्त असतानाही कमी वय असल्याचे दाखवून तर २१ पेक्षा कमी वयोगटातील तरुणींनी २१ पेक्षा जास्त वय असल्याचे दाखवून अर्ज केले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील ८३ हजार ७२२ महिलांच्या कुटुंबातील दोन महिला योजनेचा लाभ घेत असताना देखील त्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.

‘आयकर’च्या माहितीवरून तीन लाख महिला अपात्र?

योजनेत धनाढ्य विशेषतः कुटुंबाचे वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिला देखील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इन्कम टॅक्स विभागाला यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांची यादी मागितली आहे. ‘आयकर’कडील माहिती प्राप्त झाल्यावर लाडकी बहीण योजनेतील जिल्ह्यातील आणखी अंदाजे तीन लाख महिला अपात्र ठरतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

लाडकी बहीण योजनेची सद्य:स्थिती

एकूण लाभार्थी

११,०९,४७८

सुरवातीचा दरमहा निधी

१६६,४२,१७०००

पडताळणीत अपात्र लाभार्थी

२.२८ लाख

आता दरमहा लागणारा निधी

१३२.१५ कोटी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र आहे. तरीदेखील २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्यांनी अर्ज केले आहेत. दुसरीकडे एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ घेता येणार नाही असा निकष असताना देखील एकाच कुटुंबातील तीन-चार जणांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असून त्याची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू केली आहे.
- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT