PM Aawas Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Aawas Scheme : ‘मोदी आवास’ योजनेत सोलापूर जिल्हा अव्वल

PM Scheme Update : राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार २९३ ओबीसी, तर विशेष मागास प्रवर्गातील ७२६ लाभार्थींच्या घरकुलांना सोलापूर जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार २९३ ओबीसी, तर विशेष मागास प्रवर्गातील ७२६ लाभार्थींच्या घरकुलांना सोलापूर जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे.

साधारण, जानेवारीअखेरीस सर्व लाभार्थींना बांधकामासाठी १५ हजारांचा पहिला हप्ता मिळणार आहे. दोन महिन्यांत उद्दिष्टानुसार १०० टक्के लाभार्थींना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

ओबीसी लाभार्थींना घरकूल बांधणीसाठी पहिला हप्ता १५ हजार रुपयांचा, दुसरा हप्ता ४५ हजार रुपये, तर तिसरा हप्ता ४० हजार आणि शेवटचा हप्ता २० हजार रुपये, असे एकूण एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळेल. तसेच ‘मनरेगा’तून मजुरीपोटी २३ हजार २८० रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत शौचालयासाठी १२ हजार रुपयेदेखील दिले जातील.

ज्या लाभार्थींना घरकूल बांधणीसाठी स्वत:ची जागा नाही अशांना आता एक लाख रुपयांचे अनुदान मिळेल. तत्पूर्वी, मोदी आवास योजनेतून पुढील दोन वर्षांत आणखी २४ हजार लाभार्थींना घरकूल मिळेल. या योजनेच्या लाभार्थींकडे जात प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पहिल्या वर्षीचे उद्दिष्ट विलंबाने प्राप्त झाले होते, तरीदेखील जिल्हा परिषदेने अवघ्या दोनच महिन्यांत १०० टक्के लाभार्थींचे प्रस्ताव मागवून त्यांना मंजुरी दिली आहे.

तालुकानिहाय लाभार्थी

सांगोला- १३९१, पंढरपूर- १३३५, माळशिरस- १२५४, मंगळवेढा-११९८, करमाळा- १०६९, दक्षिण सोलापूर -१०५९, मोहोळ- १०५३, माढा- ८८२, बार्शी- ७३९, अक्कलकोट- ६०२, उत्तर सोलापूर- ४३७ - एकूण ११,०१९.

जिल्ह्यातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. गावचे सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून निश्‍चितपणे बेघरांना घरकुले मिळतील.
मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

नाशिक विभागाचा तपशिल खालीलप्रमाणे

जिल्हा सहकारी संघ मल्टीस्टेट खासगी दूध प्रकल्प एकूण
अहमदनगर १० १ ५३ ६४
नाशिक १ १ ७ ८
धुळे/नंदूरबार ३ ० ० ३
जळगाव १ ० १ २
एकूण १५ १ ६१ ७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT