Parasbaug
ParasbaugAgrowon

PM Poshan Shakti Nirman Yojana : उत्कृष्ट परसबागांची उभारणाऱ्या शाळांना रोख पारितोषिके

PM Scheme : पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समित्या व शिक्षकांनी परसबागा विकसित केलेल्या आहेत.
Published on

Nashik News : पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समित्या व शिक्षकांनी परसबागा विकसित केलेल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांसाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

उत्कृष्ट परसबागांची उभारणी करणाऱ्या शाळांना रोख पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, हिवाळी प्रथम तर करंजळीपाडा द्वितीय तर गव्हाणेपाडा तृतीय असे क्रमांक आले आहेत.

केंद्र शासनाने शाळांमधून परसबाग निर्माण करून, परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश पोषण आहार योजनेअंतर्गत करण्याचे निर्देश दिले आहेत. शालेय परिसरात परसबाग विकसित केल्यामुळे, जिथे मुलांना त्यांच्या स्वत:च्या भाज्या आणि फळे पिकवण्याची संधी मिळते.

मुले शाळेत त्याच्या जेवणाचा भाग म्हणून त्यांनी उगवलेली ताजी फळे आणि भाज्या खाण्यास उत्साही होतील व अधिक आनंदाने आहाराचे सेवन करतील. यामुळे त्यांना लहान वयातच चांगला व पोषणयुक्त आहार घेण्याची सवय लागेल जी आयुष्यभर राहील. या उद्देशाने जिल्ह्यात परसबाग स्पर्धा घेण्यात आली.

Parasbaug
Rabi Season : खानदेशात सततच्या ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांना फटका

तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने परसबागांचे मूल्यांकन करून प्रतितालुका प्रथम ३ क्रमांक व प्रोत्साहनपर ३ क्रमांक अशा ६ शाळांना पारितोषिेके दिलेली आहेत.

जिल्हास्तरीय स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांचे अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्यात येऊन समितीने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळांमधील परसबागांचे मूल्यांकन करून जिल्हास्तरीय पारितोषिके जाहीर केली आहेत.

Parasbaug
Drought In India : देशातील २५ टक्के भाग दुष्काळाचा चटका सोसतोय?

या समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, लेखाधिकारी विजय मोरे, पंचायत समिती नाशिकच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ,

आहारतज्ज्ञ सुप्रिया गोसावी, सहायक आयुक्त अन्न व औषण प्रशासन यू. एस. लोहकरे, प्रगतिशील शेतकरी कारभारी सांगळे यांचा समावेश होता. शाळांनी मिळविलेल्या या यशाबद्दल नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

या शाळांनी पारितोषिके पटकावली

प्रथम क्रमांक (१० हजार रुपये) जि. प. प्राथमिक शाळा, हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर)

द्वितीय क्रमांक (७ हजार रुपये) जि. प. प्राथमिक शाळा, करंजाळीपाडा (ता. दिंडोरी)

तृतीय क्रमांक (५ हजार रुपये) जि. प. प्राथमिक शाळा, गव्हाणेपाडा (ता. बागलाण)

प्रोत्साहनपर (२ हजार रुपये प्रत्येकी)...

जि. प. प्राथमिक शाळा, जळे (ता. पेठ)

जि. प. प्राथमिक शाळा, कोरपगाव (ता. इगतपुरी)

जि. प. प्राथमिक शाळा, डोल्हारे (ता. सुरगाणा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com