Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपात ४० तर उत्पादनात ४६ टक्के घट

Sugarcane Crushing Season : सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम संपला आहे. गेल्यावर्षीच्या दुष्काळाचा यावर्षीच्या ऊस गाळपास मोठा फटका बसला आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ऊस गाळपात ४० टक्के तर साखर उत्पादनात ४६ टक्के घट झाली आहे.

Team Agrowon

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : माळीनगर: सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम संपला आहे. गेल्यावर्षीच्या दुष्काळाचा यावर्षीच्या ऊस गाळपास मोठा फटका बसला आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ऊस गाळपात ४० टक्के तर साखर उत्पादनात ४६ टक्के घट झाली आहे. सरासरी साखर उताऱ्यातही एक टक्का घट झाली आहे. साखर उताऱ्यातील घट चिंताजनक आहे.

२०२३-२४ च्या हंगामात जिल्ह्यात दोन लाख १० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध होता. मागीलवर्षी जिल्ह्यात १३ सहकारी व २३ खासगी मिळून ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी एक कोटी ६८ लाख ४६ हजार ७५१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी ५९ लाख ३२ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. सरासरी साखर उतारा ९.४६ टक्के इतका होता.

२०२४-२५ च्या हंगामात जिल्ह्यात एक लाख ५० हजार ५८६ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ६० हजार हेक्टरने उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. यंदा १२ सहकारी व २१ खासगी अशा एकूण ३३ कारखान्यांनी ऊस गाळप केले. या कारखान्यांनी एक कोटी एक लाख ७४ हजार ४०३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ८.४१ टक्के सरासरी साखर उताऱ्याने ८६ लाख १० हजार ८१३ क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत गाळपात ६६ लाख ७२ हजार ३४८ मेट्रिक टन तर साखर उत्पादनात ७३ लाख २२ हजार ८७ क्विंटल घट झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा सहकारी साखर कारखान्यांचा गाळप ४३ तर खासगी कारखान्यांचे गाळप ३२ टक्क्यांनी घटले आहे. यंदा सहकारी साखर कारखान्यांचे साखर उत्पादन गतवर्षीच्या तुलनेने ५० टक्के, तर खासगी कारखान्यांचे ४२ टक्के कमी झाले आहे.

गाळप, साखर उत्पादनाची तुलनात्मक स्थिती

गाळप हंगाम २०२३-२४

कारखाने गाळप (मे.टन) साखर (क्विंटल) उतारा (टक्के)

सहकारी १३ ८१,३३,६१३ ८०,०२,३५० ९.८४

खासगी २३ ८७,१३,१३८ ७९,३०,५५० ९.१

एकूण ३६ १,६८,४६,७५१ १,५९,३२,९०० ९.४६

गाळप हंगाम २०२४-२५

कारखाने गाळप

(मे.टन) साखर (क्विंटल) उतारा (टक्के)

सहकारी १२ ४६,११,९५४ ४०,३८,९८० ८.७६

खासगी २१ ५५,६२,४४८ ४५,७१,८३३ ८.२२

एकूण ३३ १,०१,७४,४०३ ८६,१०,८१३ ८.४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT