Solapur Farmers : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप हंगामातील-२०२४ पीक विम्याच्या रकमेपोटी २७९ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर झाली होती. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार शेतकरी त्यासाठी पात्र ठरले. आता पीक विम्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर जमा झाली आहे.
मागच्यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यात या पावसामुळे बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीला फटका बसला होता. अतिवृष्टी आणि संततधारेमुळे शेतात अनेकठिकाणी पाणी साचून राहिले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीला नुकसानीची ही माहिती कंपनीच्या नियमानुसार ७२ तासाच्या आत कळवली, त्यानंतर विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीनी त्याची पडताळणी केली होती.
त्यानंतर नुकसानीपोटी ही रक्कम आता शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यात बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यालाच एकूण रकमेत सर्वाधिक वाटा मिळाला आहे. त्यातही बार्शी तालुक्यातील सर्वाधिक ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत.
तालुकानिहाय पात्र लाभार्थी शेतकरी
अक्कलकोट-३८,६९७ (४३ कोटी ४५ लाख), बार्शी- ८९,९९० (११४ कोटी १२ लाख), करमाळा-१२,८६९ (८ कोटी ७१ लाख), माढा-२२,८०० (१४ कोटी ४ लाख), माळशिरस-१५२ (१ कोटी ४१ लाख), मंगळवेढा-२७,०३९ (१४ कोटी २८ लाख), मोहोळ-८८५६ (२२ कोटी ९ लाख), पंढरपूर-९५१ (२ कोटी २९ लाख), सांगोला-३२१४ (५ कोटी ४८लाख), उत्तर सोलापूर-१२५१९ (३४ कोटी ८१ लाख), दक्षिण सोलापूर-२०,२४४ (१८ कोटी ३७ लाख)- एकूण- २ कोटी ३८ लाख ९०३ (रक्कम-२७८ कोटी ७२ लाख).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.