Solapur DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur DCC Bank : सोलापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा

Cooperative Bank : सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात आणि आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात आणि आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे.

बँकेच्या मार्च २०२४ अखेरच्या आर्थिक स्थितीचे रिस्क असेसमेंट करण्यात आले असून मार्च २०२३ अखेरचे रेटिंग सहा एवढे होते, आता मार्च २०२४ अखेर ५ रेटिंग प्राप्त झाले आहे. बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी बँकेच्या कामकाजात केलेली सुधारणा, बँकेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी सामूहिकरीत्या झालेले प्रयत्न कामी आले आहेत.

राज्य सहकारी बँकेच्या पाहणीत जिल्हा बँकेच्या कारभारात झालेली सुधारणा म्हणजे जिल्हा बँकेच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याची, प्रभावी आर्थिक नियोजनाची आणि संपूर्ण टीमची समर्पित प्रयत्नांची धडपड कामाला आल्याचे बोलले जाते.

या पाहणीसाठी बँकेचा ताळेबंद, मुख्यालय व शाखेतील कामकाज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राज्य सहकारी बँक आणि नाबार्डच्या पाहणीत जिल्हा बँकेबद्दल आलेले निष्कर्ष विचारात घेण्यात आलेले आहेत.

बँकेची पत क्षमता आणि विश्वासार्हता वाढली आहे. बँकेतील धोके कमी झाले आहेत. नियामक संस्था आणि गुंतवणूकदारांचा सोलापूर जिल्हा बँकेवरील विश्वास वाढल्याचे यावरुन दिसते, अशी प्रतिक्रिया प्रशासक कुंदन भोळे यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Orchard Damage: उष्णता, पूर्वमोसमी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका

Hingoli Crop Loan Disbursement: हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के

Fort Conservation: गड संवर्धनासाठी एकवटले मावळे

Mahabeej Seed Sales Stalled: पावसाअभावी ‘महाबीज’च्या बियाण्यांची विक्री ठप्प

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला न्यायालयाची अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT